लोह्याच्या दोन क्वॉरन्टाईन रुग्णांना घेतले ताब्यात 

file photo
file photo
Updated on

नांदेड : संबंध जगाला कोरोना व्हायरस या जीवघेण्या आजाराने थैमान घातले आहे. त्यावर आळा घालण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असतांनाच लोहा येथील दोन क्वॉरन्टाईन रुग्ण शहराच्या मुरमुरा गल्लीतून फिरत असतांना मंगळवारी (ता. २४) दुपारी ताब्यात घेण्यात आले. पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी यासाठी पुढाकार घेऊन रुग्णवाहिकेतून शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

लोहा येथील दोन क्वॉरन्टाईन रुग्ण त्यांच्या हातावर शिक्के असतानाही नांदेडमध्ये बिनधास्तपणे संचार करत असल्या गुप्त माहिती गस्तीवर असलेले वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांना मिळाली. त्यांनी लगेच जुमा मोंढा परिसरात असलेल्या मुरमुरा गल्ली भागात दोन क्वारन्टाईन रुग्ण बिनदीक्कतपणे संचार करत होते. ते अनेकांना भेटत होते. हा भयंकार प्रकार पाहून अनेकजण त्यांच्यापासून पळ काढत होते. परंतु त्यांना घेरून ताब्यात घेण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या १०८ रुग्णवाहिकेला बोलावून त्यात टाकून त्यांची रवानगी शासकिय रुग्णालयात दाखल केले. 

का हलगर्जीपणा केला याबद्दल त्यांची चौकशी

त्यांची विचारपूस केली असता ते म्हणाले की, लोहा शहरात सर्व बंद असल्याने खाण्यापिण्यासाठी नांदेडला आलो. विशेष म्हणजे हे दोघेही शिक्षीत असून या आजाराबद्दल त्यांनाही माहिती आहे. मात्र त्यांनी का हलगर्जीपणा केला याबद्दल त्यांची चौकशी सुरू आहे. 

जिल्ह्यात कडक पोलिस बंदोबस्त

नांदेड शहर व जिल्ह्यात कडक पोलिस बंदोबस्त असून अनेक चौक चुकवून हे दोघेजण एका दुचाकीवरुन आले होते. आता त्यांचा किती लोकांशी संपर्क आला याबाबत प्रशासनातील अधिकारी माहिती घेत आहे. सध्या नांदेडच्या शासकिय रुग्णालयात दोनच हे क्वारन्टाईन रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.