लातुरात एकाच साडीला दोन बहिणींनी गळफास घेऊन केली आत्महत्या

गुन्हा
गुन्हा
Updated on
Summary

बेपत्ता झाल्यानंतर एका मुलीबाबत हरवल्याची नोंद झाली तर दुसरी अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा नोंद झाला. पोलिसांकडून दोघींचा शोध सुरू असतानाच या मुली परत आल्या.

Summary

लातूर : आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोन मावस बहिणी परत आल्या. पोलिसांना जबाब देऊन त्या घरी परतल्या. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी सकाळी दोघींनी आत्महत्या केली आहे. घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत एकाच साडीला गळफास घेतलेल्या अवस्थेत या दोघींचे मृतदेह आढळून आले. सायंकाळी एका मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पंकज सुतार याच्याविरुद्ध दोघींना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला. सुतार हा हरंगूळ बुद्रुक (ता. लातूर) Latur येथील ग्रामपंचायतीचा सदस्य आहे. गीतांजली दत्तात्रेय बनसोडे (वय १७) आणि धनश्री संतराम क्षीरसागर (वय १९) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी सांगितले, की शहराच्या जवळच हरंगूळ बुद्रुक शिवारात वाढीव वस्तीत विश्वकर्मा कॉलनी आहे. two sisters hanged themsalves in latur

गुन्हा
पप्पा! मला माफ करा,असे सुसाईड नोट लिहून मुलीने संपवले आयुष्य

या कॉलनीतील गीतांजली व धनश्री या मावस बहिणी आठ दिवसांपासून बेपत्ता होत्या. गीतांजली ही विश्वकर्मा कॉलनीत राहते तर धनश्री ही मूळची कानेगाव (ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) येथील असून, ती गीतांजलीसोबतच राहत होती.बेपत्ता झाल्यानंतर एका मुलीबाबत हरवल्याची नोंद झाली तर दुसरी अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा नोंद झाला. पोलिसांकडून दोघींचा शोध सुरू असतानाच या मुली बुधवारी (ता.३०) परत आल्या. त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन कोणाविरुद्धही तक्रार नसल्याचा जबाब दिला. त्यानंतर पोलिसांनी दोघींना पालकांच्या ताब्यात दिले. त्याच्या तिसऱ्याच दिवशी शनिवारी (ता.तीन) सकाळी दहा वाजता या दोघी कपडे धुण्याचे निमित्त करून घराच्या वरच्या मजल्यावर गेल्या. तेथील पत्र्याच्या खोलीतील आडूला एकाच साडीने गळफास घेतला.

गुन्हा
पत्रकार सुभाषचंद्र वाघोलीकरांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सायंकाळी दत्तात्रेय महादेव बनसोडे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत हरंगूळ येथील पंकज सुतार याने गीतांजली व धनश्रीला पुण्याला नोकरी लावतो व अन्य कारणांवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद केल्याचे श्री. मिरकले यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.