भोकरदन (जि.जालना) : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ Modi Cabinet विस्ताराची चर्चा देशभरात झाली. महाराष्ट्र विशेषतः मराठवाड्यातून Marathwada काही अनपेक्षित नावे या विस्तारात दिसली. यात प्रामुख्याने खासदार भागवत कराड Union Minister Of State Bhagwat Karad यांचा समावेश होता. दुसरी चर्चा झाली ती विस्तारापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे Union Minister of State Raosaheb Danve यांच्या कथित राजीनाम्याची. पण राजकारणात चकवा देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रावसाहेबांना रेल्वेमंत्रालयासारखे Railway Ministry महत्त्वाच्या खात्याचे राज्यमंत्रिपद मिळाले आणि दिल्लीसह राज्यातील मीडिया, विरोधकांनाही त्यांनी चकवा दिला. विस्ताराचा धुरळा आता खाली बसला असला तरी दानवे-कराड यांच्या गट्टीचे आगळे छायाचित्रे व्हायरल झाले आणि पुन्हा त्याची चर्चा सुरू झाली. आगळे-वेगळे छायाचित्र आहे बैलगाडीचे. रावसाहेब गाडीवान बनले आहेत आणि त्यांच्या पाठीला पाठ लावून डॉ. कराड बसले आहेत. हे छायाचित्र तसे ताजे, म्हणजे पंधरा दिवसांपूर्वीचे अर्थात विस्तारापूर्वीचे. सध्याच्या राजकीय परिस्थितीला साजेसे. बैलगाडीतून रेलगाडीच्या दिशेने वाटचाल, असा त्याचा ‘अर्थ’ काढला जाऊ शकतो. two union ministers of state raosaheb danve and bhagwat karad photo viral in social media
दानवे हे दीर्घकाळ राजकारणात आहेत. अगदी सरपंच ते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री पदापर्यंतचा त्यांचा प्रवास कुणालाही भूरळ पाडेल असाच आहे. वर्षभरापूर्वी राज्यसभेवर खासदार आणि वर्ष सरत नाही तोच केंद्रात अर्थ खात्याचे राज्यमंत्री अशी उत्तुंग झेप घेणारे कराड हे देखील संघ आणि भाजपच्या पठडीत तयार झालेले, शांत स्वभावाचे गृहस्थ. नगरसेवक, उपमहापौर, महापौर, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. दानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना कराड प्रदेश उपाध्यक्ष होते. त्यामुळे दोघांचा कायम संपर्क. त्यामुळे त्यांची गट्टी जमली.
शेतात रमणारे दानवे
दानवे हे खासदार, मंत्री असले तरी साधेपणा, रांगडी ग्रामीण भाषा, विनोदी बुद्धीमुळे ते चर्चेत असतात. मूळ शेतकरी असल्याने दानवेंचा शेतकरी अवतार नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. मध्यंतरीच्या कोरोनामुळे त्यांनी बहुतांश वेळ भोकरदनजवळील नळणीच्या शेतात घालवला. शेतात ते नेहमीच रमतात. पंधरा दिवसांपूर्वी डॉ. कराड दानवेंच्या शेतात आले होते. तेव्हा दानवेंनी त्यांना बैलगाडीची सैर घडवून आणली होती. तेव्हा दोघांनाही कदाचित याची जाणीव नसावी, की लवकरच केंद्रात मंत्री म्हणून सोबत काम करावे लागेल! कराड यांच्याकडे महत्त्वाचे अर्थ राज्यमंत्रीपद आहे. पाठीला पाठ लाऊन बैलगाडीत बसणारे दोघे आता खांद्याला खांदा लाऊन मराठवाड्याच्या विकासात भर टाकतील, अशी जनतेची अपेक्षा आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.