मुलीचा मृतदेह पाहाताच आईने फोडला हंबरडा; दोन महिलांचा...

...आल्यानंतर मुलीचा मृतदेह पाहुन आईने हंबरडा फोडला.
Osmanabad Accident News
Osmanabad Accident Newsesakal
Updated on

उमरगा (जि.उस्मानाबाद) : मॉर्निंग वॉकिंगला बाहेर आलेल्या दोन महिलांचा ट्रकने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी (ता.२४) सकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली. उमरगा (Umarga) - लातूर मार्गावर कवठा पाटी ते मुदगड पाटीदरम्यान हा अपघात झाला. दरम्यान या दुर्दैवी घटनेने कवठा (ता. उमरगा) गावावर शोककळा पसरली आहे. याबाबतची प्राथमिक माहिती अशी की, कवठा गावातील महिला मॉर्निंग वाॅकिंगला लातूर मार्गावर येतात. नेहमीप्रमाणे सात-आठ महिला कवठा पाटी ते मुदगड पाटी दरम्यान गुरुवारी फिरायला जात होत्या. त्यातील पुनम बालाजी सोनवणे (वय २४) व कविता बालाजी साळुंके (वय ४५) या दोघी रस्त्याच्या खालच्या बाजुला रसवंतीगृहाजवळ बसलेल्या होत्या. (Two Women Died In Accident In Umarga Taluka Of Osmanabad)

Osmanabad Accident News
श्रीलंकेत अन्न व पाण्यासाठी मारामारी ! दोन हजार रुपयाला १ लिटर दूध मिळतयं

अचानकपणे भरधाव वेगाने उमरग्याहुन लातूरच्या (Latur) दिशेने निघालेल्या अज्ञात ट्रकने महिलांना धडक दिली. त्यात दोघींचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मदनसूरी (ता.निलंगा) बिटचे हवालदार बी. डी. भोसले घटनास्थळी गेले. मदनसूरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही महिलांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी चार वाजता शोकाकुल वातावरणात दोघींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी उशीरापर्यंत कासारशिरसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Osmanabad Accident News
औरंगाबादेत कारचा भीषण अपघात; दोन जण ठार, ४ गंभीर

...आणि आईने हंबरडा फोडला !

पुनम हिचे पदवीचे शिक्षण झाले होते. आई केशरबाईही मॉर्निंग वॉकिंगला होत्या. त्या अन्य महिलेसोबत मुदगडपाटीपर्यंत जात होत्या. तेथून परत येताना काही अंतरावर असलेल्या रसवंतीगृहाजवळ आल्यानंतर मुलीचा मृतदेह पाहुन आईने हंबरडा फोडला. अन्य महिलांचाही आक्रोश सुरू होता. (Osmanabad)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()