सिल्लोड : ‘महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर राहतील. तर सोयाबीनला देखील सात हजार रुपयांचा भाव मिळेल. तसेच सर्वसामान्यांच्या मुलांना मुलींप्रमाणे देखील मोफत शिक्षण देण्यात येईल. भरसभेत जे बोलतो ते करतोच’, अशी ग्वाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.