उमरगा, (जि. धाराशिव) - उमरगा शहरासह उमरगा व लोहारा तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या व अन्य नागरिकांच्या जिवाळ्याशी निगडित मूलभूत समस्या तात्काळ सोडवण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सातलिंग स्वामी यांनी मंगळवारी (ता.१७) मराठवाडा मूक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधुन उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.