केंद्रीय मंत्र्यांचा असाही साधेपणा; भररस्त्यात गाडी थांबवून दानवेंनी साधला गावकऱ्यांशी 'संवाद'

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रोटोकाॅल ठेवले बाजूला
Raosaheb Danve
Raosaheb Danveesakal
Updated on

जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या साधेपणा रांगडेपणासाठी ओळखले जातात. अनेकांनी ते बोलताना आपले वाटत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी रस्त्यावर बसून जेवण केल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आज शुक्रवारी (ता.सात) सकाळी मुंबईहून रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) रेल्वेने जालन्याला (Jalna) पोहोचले. भोकरदनला जात असताना त्यांनी रस्त्यात गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. या प्रसंगी त्यांच्या भोवती लहान मुले जमा झाल्याचे पाहायला मिळाले. मंत्रीपदाचा आव बाजूला ठेवून सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याची कला दानवे यांच्यात आहे. एकाला तर त्यांनी मिठाई भरवल्याचे दिसत आहे. (Union Minister Raosaheb Danve Keep Aside Protocol And Busy With Villagers In Jalna)

चिमुकल्याला मिठाई खाऊ घातताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे.
चिमुकल्याला मिठाई खाऊ घातताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे.esakal
Raosaheb Danve
PM मोदींच्या सुरक्षेवरुन अनुपम खेर म्हणाले - देव तारी, त्याला कोण मारी!

यावेळी त्यांनी सर्व प्रोटोकाॅल बाजूला ठेवले असल्याचे दिसले. आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये दानवे म्हणतात, की मुंबईहून रेल्वेने प्रवास करुन आज पहाटेच जालन्याला पोहोचलो. जालना ते भोकरदन प्रवासात, माझ्या गावी जाताना वाटेमध्ये लागणाऱ्या राजूर, लिंगेवाडी, बाभूळगाव येथील गावकऱ्यांशी संवाद साधला.

Raosaheb Danve
गरीब मुलगा पंतप्रधान झाल्याचं काॅंग्रेसला सहन होईना,संबित पात्रांचं राहुल गांधींवर टीकास्त्र

तसेच गावकऱ्यांनी देखील आपली मते व्यक्त केली. दिल्लीला असताना शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची गळाभेट घेतली होती. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()