किल्लेधारुर (जि.बीड) : पाऊस थांबल्याने शेतकरी (Farmer) वर्ग चिंतातुर झाला आहे. मात्र तालुक्यातील (Killedharur) चाटगाव येथील तलावाचा सांडवा (Pond) सोमवारी (ता.नऊ) मध्यरात्री नंतर अज्ञात माथेफिरूने फोडल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहुन जात आहे. संगमसह काही गावांना धोका निर्माण झाल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणी ताबडतोब प्रशासकिय पातळीवरुन कार्यवाही होऊन संशयितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे. पाणी हेच जीवन असल्याचे मानले जाते. मात्र अज्ञात माथेफिरुने भरलेल्या तलावाचा सांडवा फोडल्यामुळे तलावातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. एकीकडे बालाघाटच्या डोंगरपट्ट्यात शक्य होईल तेथे तलावाची निर्मिती करुन शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती होऊन (Beed) आर्थिक जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न होत असताना झालेल्या घटनेमुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
डोंगरपट्ट्यात सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे चाटगाव येथील तलाव ९८ टक्के भरला होता. चाटगाव, दिंद्रुड, संगमसह पाच ते सहा गावांच्या शिवारात शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी या तलावातून वेगवेगळ्या मार्गाने उपलब्ध होते. तलावातील संपादित क्षेत्रात काही शेतकऱ्यांनी अनाधिकृतपणे पीक लागवड केलेली असून ती पिके पाण्याखाली जात असल्याने त्यापैकीच कोणीतरी तलावाचा सांडवा फोडण्याचे काम कोणीतरी केले असावे असा संशय आहे. सांडव्याची चिरेबंदी भिंत एक फूट उंच खोल जवळपास चार फूट रुंद फोडण्यात आली आहे. पाण्याचा दाब वाढल्यास भिंतीला मोठे भगदाड पडू शकते. त्यामुळे संगम गावासह काही गावे व शेतींना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.