सहकारी व खासगी साखर कारखान्यामध्ये मोठा फरक आहे. सहकारी साखर कारखान्यात लोकसहभाग महत्वाचा असल्याने विश्वासाचे नाते निर्माण होते. अडचणीच्या काळातही विठ्ठलसाईने शेतकरी सभासदांना न्याय दिला आहे.
यंदा कार्यक्षेत्रातील ऊसाची उपलब्धता विचारात घेवून कारखान्याच्या संचालक मंडळाने चार लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले असून कारखाना आणि सभासद यांच्यातील समन्वयाचा दुवा कायम ठेवत शेतकरी सभासदांनी गाळपासाठी ऊस पाठवुन सहकार्य करावे असे आवाहन श्री. विठ्ठललसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले.