वैजापूर : एसटी बसचालक व वाहक संघटनांनी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार मिळावा, या मागणीसाठी मंगळवारपासून बंद पुकारला. यामुळे वैजापूर बसस्थानकातून एकही बस बाहेर न पडल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल झाले. संपामुळे वैजापूर आगाराच्या २७७ फेऱ्या रद्द झाल्यामुळे एका दिवसात जवळपास साडेचार लाखांचे उत्पन्न बुडाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.