Latur (Nilanga) News: वीस कोटींच्या निधीतून निलंगा शहरात होणार विविध विकासकामे

आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नांना यश
latur
latursakal
Updated on

निलंगा : राज्यात सत्तांतर होऊन महायुतीचे सरकार आल्याने निलंगा मतदार संघाला विकास निधींचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. निलंगा शहरात १८ कोटींचे रूपयाचे विकासकामे प्रगती पथावर असताना पुन्हा शहर विकासकामांसाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय निधीतून विशेष बाब म्हणून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व युवानेते अरविद पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नातून २० कोटीं रूपयाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.

निलंगा शहरातील मिलिंदनगर स्मशानभूमी विकास, अशोकनगर मुलांचे वसतिगृह व वाचनालय, आार्य समाज परिसर विकास करणे, अशोकनगर समाजमंदिर सुधारणा व सुशोभीकरण, सम्राटनगर इंद्रजित कांबळे यांचे घर ते अशोक नगर कडे जाणारा अॕप्रोचा रस्ता, शहरातील लातूर- बिदर रोड राज्यमार्ग ते शांतीवन स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता व नाली, बँक कॉलनी रोड सोलापूरे यांचे घर ते अजित माकणे घरापर्यंतनाली करणे,

latur
Latur News : सोनसाखळी चोराला बीडमधून अटक

शिवाजीनगर दक्षिण भागातील अमजत मासुलदार ते शेख बेकरीपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, शिवानी नगर दक्षिण भागातील दीपक पवार यांचे घर ते उर्दू शाळा ते अजमत मासुलदार यांचे घरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण, गणेश नाईकवाडे यांचे घर ते नाकीर मासुलदार व सुरवसे यांचे घरापर्यंत रस्ता, अहंकारी वसतिगृह ते सदगुरु प्री-इग्लिश स्कूलकडे जाणारा रस्ता, विदर रोड भारतबाई गिरणी ते बाजार समितीकडे जाणारा रस्ता,

बिदर रोड ते अॕड वाघमारे यांचे घर ते पशु दवाखाना रस्ता, शिवशक्ती लॉज ते पशु दवाखाना रस्ता, महेबुच गंजपेठ येथील दत्त मंदार ते चंद्रकांत चोपणे यांचे घरापर्यंतचा रस्ता, पेठ चावडी ते कासारसिरसी रोडपर्यंतचा रस्ता, पेठ चावडी ते मिरगाळे आप्पा यांचे घरापर्यंतचा रस्ता, मार्केट यार्ड वाजीद ट्रेडर्स नांचे दुकान पासुन ते मौला मणियार यांचे घरापर्यंतचा रस्ता यासह आदी अशी विकास कामासाठी २० कोटी रूपयाचा निधी मंजूर झाला आहे. ही कामे १५ दिवसात सुरू होतील, अशी माहिती माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.