बेपत्तांचा लागेना पोलिसांना पत्ता 

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.
Updated on

जालना - मनात आणलं तर पोलिस कोणताही गुन्हा उघड करू शकतात, असे म्हटले जाते. ते खरे आहे. मात्र अनेकदा पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारींकडे पोलिस गांभीर्याने लक्ष देत नाहीत. यात प्रामुख्याने मिसिंगच्या तक्रारी आहेत. त्यामुळे वर्ष 2005 पासून आतापर्यंत 277 मिसिंगच्या तक्रारी तपासाविना आहेत. यात तब्बल 129 महिला बेपत्ता असल्याच्या तक्रारी आहेत. 

पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार आल्यानंतर पोलिसांकडून तत्काळ त्यांची नोंद करून घेणे अपेक्षित आहे. मात्र अनेकदा "नातेवाइकांकडे असेल, येईल, एक दिवस थांबा' असे पोलिसांकडून सांगितले जाते. त्यानंतर मिसिंगची तक्रार दाखल होते. 2005 पासून ते नोव्हेंबर 2019 अखेरपर्यंत जिल्ह्यात तब्बल 382 मिसिंग तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी अजून 277 जणांचा शोध लागलेला नाही. विशेष म्हणजे यात 129 महिलांचा समावेश आहे. त्यामुळे मिसिंग तक्रारींचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून शोध घेण्याबाबत फारशा हालचाली केल्या जात नसल्याचे चित्र आहे. परिणामी मिसिंग तक्रारींचे आकडे कमी होण्यास तयार नाहीत. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून इतर गुन्ह्यांप्रमाणे मिसिंग तक्रारींकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. 

स्वत:हून परतले 105 जण 
औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंघल हे जालन्याच्या वार्षिक तपासणीसाठी नोव्हेंबर महिन्यात आले होते. त्यावेळी त्यांनी वर्षानुवर्षे मिसिंग तक्रारीच्या फायलींवरील पडलेली धूळ झाडत तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर प्रत्येक पोलिस ठाण्याच्या मिसिंग तक्रारीचा तपास करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नातेवाइकांची भेट घेऊन मिसिंग व्यक्तीची माहिती मिळविली. त्यात 105 जण स्वत:हून स्वघरी परतल्याचे समोर आले. यात 70 महिला व 35 पुरुष पोलिसांच्या तपासाविना घरी परत आल्याचे दिसून आले. 

  • 'मिसिंग' केसेसकडे काणाडोळा
  • पंधरा वर्षांपासून 382 तक्रारी,
  • 277 जण गायबच
  • तब्बल 129 महिलांचा समावेश 

मिसिंग तक्रार दाखल झाल्यानंतर त्याचा तपास केला जातो. मात्र या तपासादरम्यान काही लीड मिळाली नाही तर तो तपास मागे पडतो. तपास अधिकाऱ्यांनी मिसिंग तक्रार दाखल केल्यानंतर काही काळानंतर भेट घेऊन त्या व्यक्तीची माहिती घेणे अपेक्षित आहे. ती मोहीम आम्ही सुरू केली आहे. त्यामुळे मिसिंग तक्रारींची संख्या कमी होत आहे. 
- चैतन्य एस. पोलिस अधीक्षक, जालना. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.