वसमत - महाविकास आघाडी सत्तेत आल्यास विकासाची पंचसुत्री राबवून सर्वांगीण विकास साधणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी शुक्रवार ता. ८ दिले आहे..राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रचारार्थ वसमत येथे सायंकाळी ७ वाजता जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार फौजिया खान, आमदार प्रज्ञा सातव, माजीमंत्री कमलकिशोर कदम, शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात, दिलीप चव्हाण, दिलीपराव देसाई, माजी आमदार मुंजाजीराव जाधव, माजी आमदार पंडीतराव देशमुख,डॉ मारोती क्यातमवार, अ.हफिज अ रहेमान, सुनिल काळे यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते..यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, महिलांसिठी महालक्ष्मी योजना आणणार असून महिलांना दरमहा ३००० रुपये तसेच महिला व मुलींना एसटी मध्ये मोफत प्रवास योजना , शेतकर्यांना ३ लाख रुपये कर्ज माफ केले जाईल तसेच नियमित कर्जफेड करणारे शेतकऱ्यांना पन्नास हजार पंच प्रोत्साहन अनुदान दिले जाईल, आरोग्य सेवेमध्ये नागरिकांचा २५ लाख रुपयेत्यांना उत्तरासाठी मोफत औषधी उपलब्ध करून दिली जाईल, जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून वाढवत गरजूंना आरक्षण दिले जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले..केंद्र सरकारने शेतकरी विरोधी धोरण राबवल्यामुळे आज शेतीमालाला योग्य भाव नाही तसेच बियाणे औषधी खते यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला यासाठी मोदी सरकारचे शेतकरी विरोधी धोरण कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केलामोदी सरकारने देशातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे लोकसभा निवडणुकीत चारशे जागा मिळणार असल्याची सांगणाऱ्या मोदी सरकारला 400 जागा मिळाल्यास नाहीत उलट चंद्राबाबू नायडू व नितिश कुमार यांच्या साथीने सरकार स्थापन करावे लागले महाराष्ट्रातील जनतेने मोदी सरकारला लोकसभा निवडणुकीत चांगलाच धक्का दिल्याचेही त्यांनी सांगितले..विधानसभा निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीला मतदानातून साथ दिल्यास महाविकास आघाडी राज्यात सत्ता स्थापन करून पाचही कार्यक्रमांची अंमलबजावणी करेल असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला.तत्पूर्वी प्रस्ताविकात जयप्रकाश दांडेगावकर यांनी मी मागील निवडणुकीत पवार साहेबांनी माझ्या एका शब्दावर तिकीट दिले मी चुकलो पण त्याचा त्रास शेवटपर्यंत झाला चुक अल्याचे सांगून जिल्ह्यातील तिन्ही आमदार सत्ताधारी पक्षाचे असताना पीक वीमा मिळवता आला नाही असे म्हणाले..यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार फौजिया खान, आमदार प्रज्ञा सातव, अ.हफिज, डॉ मारोती क्यातमवार,बबनराव थोरात, भिमराव हत्तीअंबीरे यांनी मार्गदर्शन केले. सभेला हजारोंच्या संख्येने नागरीक उपस्थित होते. सुत्रसंचलन दौलत हुंबाड व आनंद बडवणे यांनी केले.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.