औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : आई-वडिलांची जबाबदारी न घेणाऱ्या प्राध्यापक असलेल्या मुलाला दरमहा सात हजारांची पोटगी देण्याचे आदेश वसमतचे उपविभागीय अधिकारी डाॅ.सचिन खल्लाळ (Sachin Khallal) यांनी दिले आहेत. यामुळे वृद्ध दांपत्याला दिलासा मिळाला आहे. औंढा तालुक्यातील सुरेश व नर्मदाबाई या वृद्ध दांपत्याने (Ederly Mother Father) मजुरी करुन आपल्या तीन मुलांना शिकविले. एका मुलाला शेती विकून प्राध्यापक बनविले आहे. तो मुखेड (जि.नांदेड) (Nanded) येथे कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहे. मात्र आपल्या कुटुंबाबरोबर राहत असलेल्या मुलाला वृद्ध आई-वडिलांची जबाबदारीचा विसर पडला. या दांपत्याचे इतर दोन मुले सांभाळ करत होते. मात्र त्यांचे कुटुंब मोठे असल्यामुळे मजुरी करणाऱ्या मुलांसोबत आईवडील कसेतरी दिवस काढत होते.(Vasmat Sub divisional Officer Order Professor Son Give Alimony To Elderly Mother-Father)
वडिलांना रक्तदाबाबरोबरच हर्नियाचा आजार जडल्याने औषधोपचाराचा खर्चाचा मुद्दा भेडसावत होता. दुसरीकडे आईला वातरोग व दृष्टी कमी झाली. त्यावर उपचारासाठी दरमहा पाच हजार रुपये खर्च येत होता. उत्पन्नाचे साधने नाहीत. इतर दोन मुले परमोड करुन खर्च करित होते. मात्र त्याने भागत नव्हते. त्यामुळे वडिलांनी अॅड स्वप्नील मुळे यांच्यामार्फत वसमतचे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या न्यायाधिकरणात निर्वाह खर्च मिळण्यासाठी अर्ज केला होता. (Hingoli)
मजुरी करणाऱ्या मुलांनी वृद्ध आई-वडील यांना बाथरुम, शौचालय असलेली खोली द्यावी व काळजी घ्यावी. प्राध्यापक असलेल्या विजय नावाच्या मुलाने आईवडिलांना दरमहा सात हजार रुपयांची पोटगीसह औषधोपचार, दवाखाना हा वैद्यकीय खर्च करावा. या आदेशाचे अवमान केल्यास कायद्यानुसार एक महिना कारावास देण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी खल्लाळ यांनी दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.