वासुदेवाचा असाही प्रमाणीकपणा... कसा तो वाचा..

फोटो
फोटो
Updated on

नांदेड : माणुसकी संपली असे वारंवार म्हंटले जात असतानाच प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे वासुदेव अशोक घोगरे यांनी दाखवून दिले. दानात मिळालेल्या कपड्यात सापडलेल्या १२ हजार रुपयांची रोकड त्यांनी धम्मपाल कदम यांच्या माध्यमातून परत केली.

वासुदेव अशोक घोगरे हे नेहमीप्रमाणे दारोदार जाऊन भिक्षा मागत होते. यावेळी एका घरून त्यांना कपडे दान करण्यात आले. वासुदेव घोगरे यांनी ते कपडे घरी येऊन तपासले असता कपड्यात बारा हजार रुपयांची रोकड असल्याचे दिसून आले. ही रोकड घेऊन वासुदेवांनी कॉंग्रेसचे ॲड. धम्मपाल कदम यांचे घर गाठले. कदम यांना पैसे व कपडे याबाबत माहिती दिली. नेमकी कोणाच्या घरून कपडे घेतले होते, हे वसुदेवाच्या लक्षात आले नव्हते, त्यामुळे धम्मा कदम यांनी वासुदेवाला घेऊन भाग्यनगर पोलीस ठाणे गाठले. भाग्यनगर पोलिसांनी या प्रकरणात लक्ष देऊन कमलबाई मधुकरराव खांडरे या कपडे दान देणाऱ्या महिलेस पोलीस ठाण्यात आणून तिच्याकडे १२ हजार रुपयांची रोकड सुपूर्द केली. धम्मपाल कदम यांच्या योग्य समन्वयाने सदर महिलेस तिचे रुपये परत मिळाले. यावेळी भाग्यनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल भोसले यांच्यासह रामदास हदवे, अमित लिंबेकर, संदीप घोगरे आदींची उपस्थिती होती.

हळदी कुंकवाचा कार्यक्रम 

नांदेड : मकर संक्रांतीनिमित्त वर्षीही राजपूत महिला संघटनेच्या वतीने हळदी कुंकवाचा एकत्रित कार्यक्रम सिडको येथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्षत्रिय राजपूत महिला जिल्हाध्यक्ष सुषमा ठाकूर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेविका जयश्री ठाकूर ह्या उपस्थित होत्या. यावेळी बोलताना सुषमा ठाकूर म्हणाल्या की, पुरातन वर्षापासून चालत असलेल्या परंपरा जपणे हे सर्व हिंदू महिलांचे कर्तव्य असून अशा परंपरेमुळे महिलांचे एकत्रीकरण होते. महिलांच्या प्रश्नावर विचार विनिमय करण्यात येतो. मराठवाड्यात राजपूत महिलांना एकत्रित करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदा चौहान यांनी तर सूत्रसंचलन नेहा राजपूत व आभार पूनम चौहान यांनी मानले. कार्यक्रमासाठी आलेल्या पाचशे पेक्षा जास्त महिलांना आकर्षक असलेले रेणुका मातेचे मुखवटे संक्रांतीचे वाण देण्यात आले. महिलांनी पतंग उडवून संक्रांतीचा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. यावेळी झालेल्या महिलांच्या विविध स्पर्धांमध्ये बरखा ठाकूर, सुनीता चौहान, पुजा ठाकूर, संगीता चौहान,  
प्रतिभा ठाकूर, बबीता चंदेल, पमा तोमर, रमा ठाकूर, तारा कायस्त, संतोषी ठाकुर, सुशीला बैस, मीना चौहान, कल्पना चौहान, गीता चंदेल, कांचन चौहान यांनी बाजी मारली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.