अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीपाल सबनीस

29 व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांची निवड
 Writer Shripal Sabnis elected President of 29th All India Navodit Marathi Sahitya Sammelan
Writer Shripal Sabnis elected President of 29th All India Navodit Marathi Sahitya Sammelansakal
Updated on

जालना : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदच्या ता.२८ व ता. २९ मे रोजी मंठा  येथे होणाऱ्या 29 व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना यासंदर्भातील पत्र अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी दिल्याची अशी माहिती मराठवाडा सरचिटणीस अनिल खंदारे यांनी दिली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेची जालना येथे नुकतीच बैठक झाली होती. यामध्ये सर्वांनूमते साहित्यिक श्रीपाल सबनीस यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दरम्यान या पूर्वी ज्येष्ठ साहित्यिक वसंत बापट, द.मा.मिराजदार, केशव मेश्राम, सुरेश भट, नारायण सुर्वे, रा.रं. बोराडे, डाॅ.जनार्दन वाघमारे, सुवर्णा पवार, भास्कर चंदनशिव  यांनी संमेलनाध्यक्षपद भूषवले आहे.  या संमेलनाचे उद्‌घाटन ग्रंथदिंडी सोहळ्याने होणार असून परिसंवाद, कविसंमेलन, कथाकथन होणार आहे.

दरम्यान २९ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डाॅ.श्रीपाल सबनीस यांनी एकूण ८३ ग्रंथाचे विपुल लेखन केले आहे. पिंपरी येथे संपन्न झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासह अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.