Video : १४४ कलमात दीडशहाणे पडले बाहेर, मग पोलिसांनी दाखवला इंगा
नांदेड : ‘कोरोना’ व्हायरसच्या भितीने राज्यात जमावबंदी कायदा (कलम १४४) सोमवारी (ता.२३ मार्च २०२०) सकाळी पाच वाजेपासून लाग करण्यात आला. जमाव बंदीच्या भितीने तरी, नागरीकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणार नाहीत व ‘कोरोना’ व्हायरसला आळा घालणे शक्य होईल असे वाटत होते. परंतु, सोमवारी जमावबंदीचा आदेश झुगात नांदेड शहरातील काही अतिउत्साहित नागरीकांनी बिनधास्त रस्त्यावर स्वार होत कायद्याची पायमल्ली करुन स्वतःचा व दुसऱ्यांचा जिव धोक्यात घालत आहेत. |
मंगळवारी (ता.३१ मार्च २०२०) पर्यंत जमावबंदीचा कायदा लागु करण्यात आला आहे. या दरम्यान कुणीही घराबाहेर पडु नये. तसेच अत्यावश्यक सेवा सुविधाच सुरु ठेवण्यात येणार आहे. असे असताना देखील काही अती उत्साही नागरीक बिनधास्तपणे रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणेला ‘या’ नागरीकांना हात जोडून समजावून सांगण्याची वेळ आली अहे. तरीही ते ऐकत नसल्याने पोलिसांना बळाचाही वापर करावा लागत आहे. हेही वाचा - जनता कर्फ्यू : पोलिसांचा चोख बंदोबस्त, एसपी मगर रस्त्यावर |
|||
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.