टाकावू भांड्यांपासून मूर्ती
एका ठिकाणी हा व्यवसाय चालत नसल्याने त्यांना गावोगाव भटकंती करावी लागत आहे. ही कलाच आता उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. यावरच कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. तांबे, पितळ व जर्मनच्या जुन्या टाकावू भांड्यांपासून मूर्ती तयार करीत आहेत. बाजारात पितळ, तांबे, जर्मनच्या मूर्ती विकत घ्यायच्या तर हजारो रुपये किंमत आहे. त्यामुळे ग्रामस्थही टाकावू भांड्यांपासून मूर्ती बनवून घेत आहेत. विविध देवदेवता, महापुरुषांच्या मूर्ती, विविध प्राण्यांच्या मूर्ती बनवून घेताना ग्रामस्थ दिसून येत होते.
हेही वाचा...आजपासुन होट्टल महोत्सव; काय आहे महत्व ते वाचा
अशी तयार करतात मूर्ती
मूर्ती तयार करताना पितळेचे भांडे भात्यावर गरम करून त्यात रासायनिक क्रिया करून त्याचे पाणी केले जाते. एका भांड्यात लाल रंगाची मऊ माती टाकून त्यात मूर्तीचे साचे ठेवले जातात. त्यामध्ये भांड्याचे तयार केलेले पाणी एका छिद्रातून साच्यात टाकले जाते. त्यानंतर साचावरील माती व्यवस्थित केली जाते. त्यानंतर ही माती बाजूला करून तयार झालेली मूर्ती बाहेर काढली जाते. या साचातून अवघ्या काही मिनिटांच मूर्ती तयार होते.
हेही वाचा...साई जन्मभूमीचा विकास हवा, त्यावर वाद नको
बाराशे रुपये मिळते मजुरी
एक मूर्ती तयार करण्यासाठी पन्नास रुपये मजुरी घेतली जाते. दिवसभरात वीस ते पंचवीस मूर्ती तयार केल्या जाताहेत. खर्चवजा जाता एक हजार ते बाराशे रुपये मजुरी मिळत असल्याचे पाशुमियॉं यांनी सांगितले. हा व्यवसाय एका गावात अधिक दिवस चालत नसल्याने त्यांना गावोगाव जावून ही कामे करावी लागताहेत. मुलांना घरी आजी, आजोबा व मोठ्या व्यक्तींजवळ ठेवून कामासाठी भटकंती करावी लागत असल्याचेही ते म्हणाले.
गोवागाव भटकंती
वडिलोपार्जित चालत आलेली कला पुढे मी जोपासली. आता ही कलाच आमच्या उदरनिर्वाहाचे साधन बनली आहे. मात्र, यासाठी गोवागाव भटकंती करावी लागते. मात्र, कलेनेच जीवनाला आधार दिला आहे.
-पाशुमियॉं लातूरवाले
|