फुलंब्री - राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे आदर्श आचारसंहिता लागतात भावी आमदारांचे पोस्टर गायब झाले असून फुलंब्री शहरातील मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहेत. मागील गेल्या तीन - चार महिन्यापासून दररोज सातत्याने एकापाठोपाठ एक पोस्टरबाजी करून आमदार होण्याची इच्छा असणारे इच्छुकांनी मोठे बॅनरबाजी केली होती. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर सातत्याने पोस्टर झळकत होते. मात्र आता आचारसंहिता लागल्याने मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत आहे.