टायर जाळून शेतकऱ्यांनी रत्नागिरी-नागपूर महामार्ग रोखला; घाडगेंच्या समर्थनार्थ सर्वपक्षीयांसह शेतकरी एकवटले

Vijayakumar Ghadge Patil Andolan Ausa : सोयाबीनला बाजारात मिळणारा दर आणि शासनाने जाहीर केलेला हमीभाव यामधून शेतकऱ्यांनी घातलेला खर्चही निघत नाही.
Ratnagiri-Nagpur National Highway Andolan
Ratnagiri-Nagpur National Highway Andolanesakal
Updated on
Summary

सरकारने या आंदोलनाची वेळीच दखल नाही घेतली, तर आंदोलन तीव्र करण्याचा मानसही यावेळी उपस्थितांनी बोलून दाखविला.

औसा : सोयाबीनला प्रतिक्विंटल साडेआठ हजार हमी भाव व शेतकऱ्यांची (Farmers) सरसकट कर्जमाफीसाठी गेल्या आठ दिवसांपासून छावाचे शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील हे आमरण उपोषण करीत आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देऊन सरकारला जाग आणण्यासाठी सर्वपक्षीयांसह शेतकऱ्यांनी आज औशात रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग ३६१ (Ratnagiri-Nagpur Highway 361) एक तासाहून अधिक काळ रोखून धरला. तर, संतप्त शेतकऱ्यांनी महामार्गावर टायर पेटवून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पोलिसांनी तात्काळ पाणी ओतून पेटलेले टायर विझविले. सोयाबीनला बाजारात मिळणारा दर आणि शासनाने जाहीर केलेला हमीभाव यामधून शेतकऱ्यांनी घातलेला खर्चही निघत नाही. आता तर अतिवृष्टीमुळे आहे ते पीकही हातचे गेले आहे. जमीन खरवडून गेल्याने शेतकऱ्यांनी आता जगावे की मरावे अशी परिस्थिती निर्माण झाली असताना सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत असल्याने गेल्या अठरा तारखेपासून छावाचे शेतकरी नेते विजयकुमार घाडगे हे औशाच्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहेत.

Ratnagiri-Nagpur National Highway Andolan
राष्ट्रवादीचं टेन्शन वाढवणारी बातमी; माढ्यातून परिचारक उतरणार निवडणुकीच्या रिंगणात? राजकीय घडामोडींना वेग

आठ दिवस उलटल्यावर घाडगे यांची प्रकृती खालावली असल्याने सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना, शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी घाडगे यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी रत्नागिरी-नागपूर ३६१ महामार्ग अप्रोच रोड चौकात सुमारे एक तास रोखून धरला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर पेटवून सरकार निर्णय घेण्यास करीत असलेल्या विलंबचा तीव्र शब्दात निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी तात्काळ पाणी ओतून पेटलेले टायर विझविले.

Ratnagiri-Nagpur National Highway Andolan
डोकेफोड आंदोलनाने पडली धनगर आरक्षणाची ठिणगी; सांगलीत दीड दशकांपूर्वी माजी मंत्र्याचं आंदोलन, अद्याप तोडगा नाहीच!

यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सरकारला धारेवर धरले. सरकारने या आंदोलनाची वेळीच दखल नाही घेतली, तर आंदोलन तीव्र करण्याचा मानसही यावेळी उपस्थितांनी बोलून दाखविला. यावेळी बोलतांना सेनेचे माजी (ठाकरे गट) आमदार दिनकर माने यांनी येणाऱ्या एक-दोन दिवसात सरकारने उपोषणकर्ते विजयकुमार घाडगे यांच्या मागण्या मान्य नाही केल्या, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हेच शेतकरी या सत्ताधारी सरकारला हिसका दाखवतील असा इशारा दिला.

Ratnagiri-Nagpur National Highway Andolan
Ratnagiri-Nagpur National Highway Andolanesakal

या आंदोलनात माजी आमदार दिनकर माने, राज्य बाजार समितीचे उपाध्यक्ष संतोष सोमवंशी, राजकुमार सस्तापुरे, श्रीपती काकडे, शाम भोसले, रशीद शेख, सुभाष पवार, योगीराज पाटील, विद्या पाटील, जयश्री उटगे, पप्पू कुलकर्णी, संगीता लातूरकर, सई गोरे, राजेंद्र मोरे, राजू कसबे, भगवान माकणे, अमर बिराजदार आदी उपस्थित होते. आंदोलन शांततेत व्हावे यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.