नांदेड : पासदगाव येथील वारकरी आश्रममध्ये ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळातील महिला नियमित हरिनामासोबतच नियमित गजर करतात. विशेष म्हणजे या सर्व महिला दिवसभर शेतामध्ये कष्ट करून भजनात दंग होतात. शिवाय मुलांमध्ये वारकरी संप्रदायाचीही बीजे अशोक महाराज आळंदीकर यांच्या पुढाकाराने पेरत आहेत.
नांदेड शहरापासून जवळच मालेगाव रोडवर पासदगाव आहे. आसना नदीच्या तीरावर गावकऱ्यांच्या पुढाकारातून १९९९ मध्ये अडीच एकरामध्ये वारकरी आश्रमाची स्थापना केली. तेथे अशोक महाराज आळंदीकर या आश्रमाची देखभाल करतात. त्यांना लहानपणापासूनच भजन-गायनाची आवड. इयत्ता तिसरीत असल्यापासून ते पंढरपूरची पायी वारी करतात. वारकरी संप्रदायाचे शिक्षण त्यांनी आळंदीतून पूर्ण केले. आतापर्यंत परिसरातील ५० वर विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाचे शिक्षण त्यांनी या आश्रमातून दिले आहे. विशेष म्हणजे हे विद्यार्थी आज गावागावांत जावून समाजप्रबोधनासह वारकरी संप्रदायाचा प्रसार, प्रचार करीत आहेत.
हेही वाचा - चोरट्यांची नविन वर्षात पोलिसांना सलामी
आश्रमाला येतेय यात्रेचे स्वरूप
सद्यस्थितीत मुलांना योग्य दिशा मिळत नसल्याने भरकटत चालली आहेत. त्यांना योग्य दिशा देण्याचे कार्य या वारकरी अश्रमातून होत आहे. संस्कारासोबतच भजन-गायन, पखवाज वादनाचे शिक्षण येथे दिले जाते. पासदगाव येथी ग्रामस्थांनी या आश्रमासाठी अडीच एकर जमीन दान दिलेली आहे. येथे ज्ञानेश्वर महाराज, वैष्णोदेवी, भगवान शंकर आणि विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. दररोज परिसरातील भाविकांचे येथे गर्दी असते. आषाढी तसेच कार्तिकी एकादशीला येथे परिसरातील पायी दिंड्या येत असल्याने आश्रमाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.
नियमित पंढरपूरला पायी वारी
पासदगावातील शेतकरी महिला दिवसभराचा शीण घालविण्यासाठी आश्रममध्ये येवून नियमित भजन-गायन करतात. मंडळातर्फे नवरात्रोत्सवात नऊ दिवस भजनाचे कार्यक्रम होतात. संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा साजरा केला जातो. श्रावण महिन्यात ज्ञानेश्वरी पारायण होते. दररोज काकडा भजन आणि अन्नदानही या महिन्यात होते. पासदगावातील महिलांसह पुरुषही २००३ पासून नियमित ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत पंढरपूरला पायी वारी करतात.
अठरा वर्षांपासून सातत्य
वारकरी आश्रमामध्ये पासदगावसह नांदुसा, पुयणी, काकांडीसह नांदेड शहरातूनही भाविक १८ वर्षांपासून सातत्याने भजन-गायन करतात. यामध्ये आत्माराम ढगे वाडीकर, कपाळे आचारी, चंद्रकांत पांडे, देवीदास नांदुसेकर, कौतिकबाई जाधव, सरस्वती जाधव, संगीता जाधव, भागीरथीबाई जाधव, बालाजी नावकीकर, वसंत गिरी, पुष्पा गिरी, चित्ररेखा शितळे, त्रिवेणी धोंडगे, मनकर्णा वाडीकर, गंगासागर गाढे, सुनंदा पांडे, वनमाला गिरी यांचा समावेश आहे.
हे देखील वाचलेच पाहिजे - मुलगी जन्मलीये..मग फुकट जिलबी खा !
मुलांवर संस्कार अत्यावश्यक
स्पर्धा तीव्र झाल्याने मुलांकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही. त्यामुळे मुलांवर अध्यात्मिक संस्कार व्हावेत, वारकरी संप्रदायाचे महत्त्व वाढावे, धर्मप्रचार व्हावा यासाठी या वारकरी आश्रमाची स्थापना करण्यात आली आहे.
- अशोक महाराज आळंदीकर, पासदगाव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.