हिंगोली : कळमनुरी विधानसभेचा निकाल लागल्यानंतर शिंदे सेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावेळी गोळीबार झाल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला, तर हाणामारीत चौघे जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास हिंगोली शहरात घडली. जखमींना उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.