वाकोडीत पहिल्या मराठी साहित्य संस्कार संमेलनास उत्साहात सुरुवात

ग्रंथदिंडीत महामानवाच्या वेशभूषा साकारात लेझीम पथकाचे आकर्षण
Wakodi first Marathi Sahitya Sanskar Sammelan
Wakodi first Marathi Sahitya Sanskar Sammelansakal
Updated on

कळमनुरी (जि.हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथे आयोजित पहिल्या मराठी साहित्य संस्कार संमेलना निमित्त सोमवार ता.१८ ला शालेय विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, राणी लक्ष्मीबाई, यासह संत साहित्य क्षेत्रांमधील महामानवांच्या वेशभूषा साकारून लेझीम व बँडच्या निनादात ग्रंथदिंडी काढली या ग्रंथदिंडी ला गावातील नागरिकांनी प्रतिसाद दिला.

मराठी साहित्य संस्कार मंडळ आयोजित वाकोडी येथे पहिल्या मराठी साहित्य संस्कार संमेलनास उत्साहात सुरुवात झाली. सकाळपासूनच गावातील शाळेतील विद्यार्थ्यांनी गावांमध्ये होत असलेल्या साहित्य संस्कार संमेलनामध्ये सहभागी होण्याकरिता उपस्थिती लावली सकाळी सात वाजता गावामधून ग्रंथदिंडी काढण्यात आली या ग्रंथ दिंडी मध्ये गावातील भजनी मंडळ सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी बाल वारकरी, संत साहित्य व विविध महामानवांच्या वेशभूषा साकारल्या.

ज्यामध्ये संत ज्ञानेश्वर, निवृत्ती महाराज, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, विठ्ठल रुक्मिणी, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, वासुदेव, लोकमान्य टिळक, विनायक सावरकर, राणी लक्ष्मीबाई , संत मीराबाई, यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वेशभूषा गावातील नागरिकांचे आकर्षण ठरले.

ग्रंथ दिंडी मध्ये मराठी साहित्य संस्कार मंडळाचे संस्थापक दत्ता डांगे, उपसरपंच शिवाजी भवर, विजय वाकडे ,प्रा राजाराम बनसकर, सखाराम उबाळे, जयदीप काकडे, सुदर्शन व्हंगले, पंडित नरहरी, हनवता चीलकर, बालाजी जारंडे, प्रताप देशमुख, गौतम ढोले, गोविंद लोंढे ,पांडुरंग कपाटे, गजानन मिरटकर, दिलीप रामपुरे, गायत्री गोस्वामी, रेखा भरडे, वंदना चीलकर, राजेंद्र पाटील, ओममाला जाधव, ज्योती नायकवडे, नीता कुलकर्णी, यांच्यासह गावातील महिला व नागरिक सहभागी झाले होते.

विद्यार्थिनींचे लेझीम पथक बँडच्या निनादत ही ग्रंथदिंडी गावातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत असताना गावातील महिलांनी ग्रंथदिंडी असलेल्या पालखी व विठ्ठल रुक्मिणी ची वेशभूषा साकारलेल्या सजीव देखाव्यांचे पूजन केले. ग्रंथदिंडी संमेलनस्थळी आल्यानंतर संमेलन स्थळावर दत्ता डांगे यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली यावेळी संमेलनाध्यक्ष शंकर वाडेवाले, संमेलनाचे उद्घघाटक बाबाराव मुसळे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा डॉ केशव देशमुख, देविदास फुलारी, विजय वाकडे, प्रा डॉ माधव जाधव, बबन शिंदे, द.आ. गुडुप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथप्रदर्शन व चित्र प्रदर्शनाचे उद्घघाटन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()