Beed : गेवराईच्या तालुका कृषी अधिकारी यांची मनमानी; कर्मचाऱ्यांचा सामुहिक रजेवर जाण्याचा इशारा!

आढावा बैठकीत अर्वाच्य भाषा वापरून महिला कर्मचा-यांच्या समोर कमरेखाली भाषा करुन शिविगाळ करणे, अंगावर धाऊन प्रस्ताव फेकुन मारणे,एवढ्यावर समाधान झाले नाही तर सेवक यास माहाण केल्याचा प्रकार झाला आहे.
warning of employees to go on collective leave over behaviour of agriculture Officer of Gevrai beed
आढावा बैठकीत अर्वाच्य भाषा वापरून महिला कर्मचा-यांच्या समोर कमरेखाली भाषा करुन शिविगाळ करणे, अंगावर धाऊन प्रस्ताव फेकुन मारणे,एवढ्यावर समाधान झाले नाही तर सेवक यास माहाण केल्याचा प्रकार झाला आहे.Sakal
Updated on

जातेगाव(जि.बीड) : जिल्हा कृषी अधीक्षक यांच्यानंतर आता गेवराई तालुका कृषी अधिकारी यांची देखील मागील काही दिवसापासून मनमानी वाढल्याने कर्मचा-यांना शेतक-यांची कामे करणे मुश्किल होऊन बसले आहे.परिणामी शेतक-यांनी दाखल केलेली प्रस्ताव रखडत आहे.यामुळे कर्मचा-यांनी ता एक ऑगस्ट पासून सामुहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला आहे.

गेवराई येथील तालुका कृषी कार्यालयातील कृषी अधिकारी मागील काही दिवसापासून मनमानी वाढली आहे. आढावा बैठकीत अर्वाच्य भाषा वापरून महिला कर्मचा-यांच्या समोर कमरेखाली भाषा करुन शिविगाळ करणे, अंगावर धाऊन प्रस्ताव फेकुन मारणे,एवढ्यावर समाधान झाले नाही तर सेवक यास माहाण केल्याचा प्रकार झाला आहे.

प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी यांना अपनास्पद वागवणूक देत आहेत.शेतक-यांची ठिबक,स्प्रिंकलर प्रस्तावावर त्रुटी दाखवून फेकून देणे असे विशिप्त प्रकार तालुका कृषी अधिकारी करत आहेत.

या त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून गेवराई येथील तालुका कृषी अधिकारी यांनी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.याची दखल न घेतल्यास ता एक ऑगस्ट पासून सामुहिक रजेवर जाण्याचा इशारा कर्मचा-यांनी दिला आहे.

दरम्यान, बीड जिल्हा अधिक्षक हे देखील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देत असतानाच आता गेवराई तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने काम करणे अवघड होऊन बसले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.