वसमत : वसमत येथे माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे यामध्ये घराची किरकोळ नुकसान झाले कुरुंदा येथे गावकऱ्यांनी मंगळवारी ता. ३१ पहाटे पासूनच नवीन बसस्थानकासमोर ठाण मांडले असून गिरगावात सलग दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी परिक्षेवर बहिष्कार टाकला आहे.
हिंगोली जिल्हयात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी आंदोलन चांगलेच आक्रमक झाले. तेलगाव पाटी येथे एका तरुणाने पेटवून घेतले असून त्यात तो ७० टक्के भाजला आहे. या तरुणावर उपचार सुरू आहेत.
या आंदोलनाची धग आणखी वाढली असून आज सकाळीच माजी मंत्री तथा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जेष्ठ नेते डॉ.जयप्रकाश मुंदडा यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. घराचे नुकसान झाले आहे. वसमत चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला पोलिसांनी या प्रकरणात तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे.
त्यानंतर आज सकाळीच कुरुंदा येथील गावकऱ्यांनी नवीन बसस्थानकावरील मुख्य रस्त्यावर ठाण मांडले. आरक्षण मिळे पर्यंत येथून हलणार नाही अशी भुमीका गावकऱ्यांनी घेतली असून सकाळचा नाश्ता देखील रस्त्यावर बसूनच घेतला.तसेच जनावरे रस्त्यावर आणून त्यांची दूध रस्त्यावरच काढले यामुळे वसमत मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली आहे.
वसमत तालुक्यातील गिरगाव येथील बहिर्जी स्मारक विद्यालयातील २३० विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी परिक्षेवर बहिष्कार टाकला. आज गणित भाग दोन या विषयाचा पेपर होता. मात्र विद्यार्थ्यांनी परिक्षा दिलीच नाही. आरक्षणाची घोषणा होई पर्यंत परिक्षा देणार नसल्याचे विद्यार्थ्यांनी जाहिर केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.