Latest Rain Update: मराठवाड्यातील शेती औद्योगिक वसाहत शहर ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागवणारा जायकवाडी धरणात अहमदनगर नासिक भागातील धरणातून गोदावरी नदी मार्गाने अर्धा लाखाचेवर क्युसेकने पाणी आवक दाखल झाल्याने सोमवार (ता.५) दुपारी दोन वाजेपर्यंत धरणाचा पाणीसाठा १४.८९ टक्के झाला.
नागमठाण गोदावरी नदी मार्गाने जायकवाडी जलाशयाकडे जवळपास ५१००० हजार क्युसेकने पाणी झेपावल्याने पैठण तालुक्यातील लोहगाव परिसरातील जायकवाडी धरण जलफुगवंटा क्षेत्रात झपाट्याने पाणी वाढत असल्याने धरणग्रस्त शेतकऱ्यांनी पाणी उपसा करण्यासाठीचे विद्युत पंप पाईप वायर स्टार्टर आदी साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी धावपळ लगबग सुरू आहे.
गेल्या आठवड्यात चार टक्के पाणी साठा असलेल्या जायकवाडी नाथ सागरात अहमदनगर नासिक भागातील भंडारदरा, दारणा, भावली, कडवा,भाम, वालदेवी, पालखेड, नांदूर मध्यमेश्वर बंधारा, गंगापूर, होळकर ब्रीज, आदी मोठ्या छोट्या धरणातून हजारो क्युसेक पाणी गोदावरी नदी पाञा कडे सोडल्याने गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक जलफुगवंटा भागात दाखल होत असल्याने आठवडाभरापूर्वी चार टक्के पाणी साठा हळूहळू वाढ होत असताना.
माञ गेल्या चार पाच दिवसांपासून अहमदनगर नासिक भागातील धरणे क्षेत्रात पाऊस होऊन हे प्रकल्प आनशी ते शंभर टक्के भरत आल्यामुळे हजारो क्युसेक पाणी रविवार व सोमवारी सोडण्यात आलेले पाणी गोदावरी नदी पाञ मार्गाने जायकवाडी नाथ सागराकडे झेपावल्या मुळे सोमवार दुपारी दोन वाजता पंधरा टक्के पर्यंत पाणी साठ्याची मजल गेल्यामुळे लोहगांव प
गेल्यामुळे लोहगांव परिसरातील ब्रम्हगव्हाण, मावसगव्हान,लामगव्हान जोगेश्वरी, मुलानीवाडगाव, विजयपूर, शेवता, तारूपिपंळवाडी, अमरापूर वाघुडी, ढाकेफळ, शिवारातील जल फुगवटा क्षेत्रातील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात धरण साठा जसा जसा खालावत गेला तस तसे आपले शेतीपंप पाणी उपसा करण्यासाठी मागे मागे हलवली होती.
त्या ठिकाणी पाणी पसारा वाढत असल्याने दोन दिवसांपासून शेतीपंप पाईप, वायर स्टार्टर आदी साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.परतू धरण जलफुगवंटा भागात अधुन मधुन रिमझिम पाऊस पडत असुन खरीप पिकासाठी जोरदार पाऊसाच्या प्रतिक्षेत शेतकरी आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.