Water scarcity : जालना जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा; १० गावांसह चार वाड्यांना ११ टॅंकरने पाणीपुरवठा

मागील वर्षीही उन्हाळ्यात जिल्ह्यामध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती
Water scarcity in Jalna Water supply by 11 tankers to 10 villages
Water scarcity in Jalna Water supply by 11 tankers to 10 villagessakal
Updated on

जालना : जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील काही गावांना जिल्हा प्रशासनाला टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात सध्या दहा गावांसह चार वाड्यांना ११ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यासाठी बारा विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात यंदा पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्ष्यात  घेऊन एप्रिल ते जून या कालावधीसाठी जिल्हा प्रशासनाकडून टंचाई निवारणासाठी सहा कोटी ४४ लाख दोन हजार रुपयांचा टंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार जूनपर्यंत जिल्ह्यातील सुमारे १६२ गावे व दोन वाड्यांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ येण्यासाठी शक्यता आहे.

Water scarcity in Jalna Water supply by 11 tankers to 10 villages
Water Scheme : लासलगावसह 16 गावांच्या पाणीयोजनेसाठी नियंत्रण समिती

शिवाय या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी खाजगी विहिरींचे अधिग्रहण आणि टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने तयारी ही केली आहे. त्यानुसार मे महिन्यात जिल्ह्यात टँकर सुरू करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे.

बदनापूर तालुक्यातील माळेगाव, भोकरदन तालुक्यातील कोदा, तपोवन, विझोरा, तपोवन अंतर्गत असलेला तांडा, जाफराबाद तालुक्यातील वानखेडा, रास्तळ, सोनखेडा, भराडखेडा, गोपी, जानेफळ, घनसावंगी तालुक्यातील बोरगाव अंतर्गत असलेले तीन तांडे अशा एकूण दहा गावांसह चार वाड्यांसाठी ११ टँकर सुरू केले आहेत.

Water scarcity in Jalna Water supply by 11 tankers to 10 villages
Pune Water Supply : पुणेकरांसाठी आली काटकसरीची वेळ ! दर गुरुवारी होणार पाणीकपात

यात सहा शासकीय तर पाच खाजगी टँकर सुरू करण्यात आले आहेत. या अकरा टँकरच्या २८ फेऱ्यांच्या माध्यमातून १४ हजार ६६० ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.  यासाठी जिल्हा प्रशासनाकडून १२ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. दरम्यान, मे महिन्यात वाढलेला उन्हाची तीव्रता लक्षात घेता येत्या काळात टँकरच्या मागणी वाढ होण्याची शक्यता आहे.

गतवर्षीही होता टँकरचा आधार

मागील वर्षीही उन्हाळ्यात जिल्ह्यामध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती. गतवर्षी जून महिन्यात ४३ टॅंकर सुरू होते. यंदाही मे महिन्यात टँकर सुरू करण्याची वेळ आली असून उपविभागीय अधिकारी यांच्याकडे टँकरच्या प्रस्ताव येत आहेत. त्यामुळे यंदा टॅंकरच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.