निलंगा : तालुक्यातील मसलगा येथील मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर भेग पडल्याने खबरदारी म्हणून सहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. सध्या प्रकल्पातील पाणीपातळी पन्नास टक्क्यांवर ठेवण्यात आली. .प्रकल्पाच्या धोक्याबाबत शनिवारी (ता.सात) छत्रपती संभाजीनगर येथील भूगर्भशास्त्र विभागाच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली. मात्र धोका आहे किंवा नाही याबाबतची अधिकृत माहिती अद्यापही प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.तालुक्यातील मोठा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर भेग पडून एक बाजू दबत चालल्याची बाब येथील शेतकऱ्यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास दिली. .त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रकल्प प्रशासनाने तत्काळ दोन गेट १५ सेंटिमीटर व चार गेट २ सेंटिमीटर उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. प्रकल्प फुटेल म्हणून मसलगा सह पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. उपविभागीय अधिकारी शरद झाडके, प्रभारी तहसीलदार प्रवीण आळंदकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील, उपअभियंता पवार, शाखा अभियंता अजय जोजारे, छत्रपती संभाजीनगर येथून भूगर्भशास्त्र विभागातील तज्ज्ञांच्या पथकाने जवळपास दोन तास पाहणी केली. त्यानंतर प्रकल्पाचा अहवाल वरिष्ठांना सादर करू असे सांगितले..मात्र धोका टाळण्यासाठी दोन दिवसापासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने जवळपास ४५ ते ५० टक्के इतका पाण्याचा विसर्ग झाला आहे. सध्या प्रकल्पात पन्नास टक्के पाणीसाठा ठेवण्यात आला आहे. दोन दिवसात प्रकल्पाच्या धोक्याबाबत मातीचे परीक्षण, जमिनीमध्ये बोअर घेऊन सविस्तर माहिती घेतली जाणार आहे. सध्या चार दरवाजे बंद करून दोन दरवाजे पाच सेंटिमीटरने वर ठेवण्यात आले आहेत. प्रकल्पात पाण्याची आवक सुरू आहे. मात्र सहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पाणी सोळ नदी काठाच्या शेतकऱ्यांच्या शेतात शिरले, त्यामुळे जवळपास ५० हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अद्याप तरी प्रकल्पाच्या सुरक्षित अथवा असुरक्षित बाबत अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली नसली तरी साठवलेले पन्नास टक्के पाणी सोडून देण्याची वेळ सध्या तरी प्रशासनावर आली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.