धाराशिव : मागील टंचाईच्या काळापासून ते जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत चालू असलेल्या पाणीपुरवठा टँकर योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. तब्बल दहा महिने राबविण्यात आलेल्या या टँकर पाणीपुरवठा योजनेतुन जिल्ह्यात जवळपास १५० टँकर्स लावण्यात आले होते. संबंधित ठेकेदारास याच्या देयकाची रक्कम देण्याच्या हालचाली सध्या युद्ध पातळीवर सुरू आहेत. मात्र दहा ते अकरा महिने उलटूनही या टँकर्सचे क्षमता प्रमाणपत्र संबंधितांनी दिले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यात कोट्यावधींचा घोटाळा असल्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.