Jalna Rain Update : शेतकऱ्यांना दिलासा! जालना शहरासह जिल्ह्यात पाऊस; हवामान विभागाकडून यलो अलर्ट

यंदा पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. जुलै महिना उघडला तरी जिल्ह्यात अद्यापि जोरदार पाऊस झालेला नाही.
Jalna Rain Update
Jalna Rain UpdateSakal
Updated on

जालना : शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (ता.चार) ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. यात शहरात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, भोकरदन तालुक्यातील विविध भागात जोरदार पाऊस झाला. शिवाय जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे पावसाने हजेरी लावली. दरम्यान जिल्ह्यात बुधवारी (ता.पाच) हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

यंदा पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. जुलै महिना उघडला तरी जिल्ह्यात अद्यापि जोरदार पाऊस झालेला नाही. मंगळवारी जालना शहरात दुपारपर्यंत उन्हसावलीचा खेळ सुरू होता. दुपारी चार वाजेनंतर आकाशात ढगांची मोठी गर्दी झाली.

त्यामुळे शहर आणि परिसरात जोरदार पाऊस होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, शहरात पावणे सहा वाजेच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. शहरात काही काळ अधूनमधून पावसाच्या रिमझिम सरींनी हजेरी लावली.

Jalna Rain Update
Maharashtra Rain Update : पुढील ७२ तास महत्वाचे; राज्यात 'येथे' होणार पाऊस

त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जालनेकरांना दिलासा मिळाला. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात जालनेकर अद्यापि मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने जिल्ह्यात बुधवारी (ता.पाच) यलो अलर्ट जारी केला आहे.

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. शिवाय गुरुवार ते शनिवार दरम्यान जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Jalna Rain Update
Konkan Rain Update: वरूणराजाने रायगडाला झोडपले, दोन नद्या इशारा पातळीवर

त्यामुळे नागरिकांनी आपत्ती परिस्थिती उद्‌भवल्यास तहसील कार्यालय, पोलिस ठाणे व जिल्हा नियंत्रण कक्षाशी ( ०२४८२-२२३१३) संपर्क करण्याचे आवाहन, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केशव नेटके यांनी केले आहे.

आतापर्यंत केवळ ६६.१० मिलिमीटर पाऊस

जिल्ह्यात ता. एक जून ते आतापर्यंत सरासरी १५४.०७ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. मात्र, यंदा आतापर्यंत ६६.१० मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये बदनापूर तालुक्यात सर्वाधिक ८८.८०,

Jalna Rain Update
Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी

अंबड तालुक्यात ७९.६०, घनसावंगी तालुक्यात ७२, जाफराबाद तालुक्यात ६८, जालना तालुक्यात ६४, मंठा तालुक्यात ६१.३०, भोकरदन तालुक्यात ६१ आणि परतूर तालुक्यात ५१.८० मिलिमीटर पाऊस आतापर्यंत झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे.

ठिकठिकाणी पावसाची हजेरी

भोकरदन शहरासह पारध, राजूर, टेंभुर्णी, केदारखेडा, अंबड, कुंभार पिंपळगाव, वडीगोद्री परिसरात मंगळवारी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भोकरदन शहर व परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

Jalna Rain Update
Rain Update : पावसाने उघडीप दिल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके धोक्यात; शेतकरी चिंतेत

तालुक्यातील केदारखेडा, जवखेडा ठोंबरीत पावसाचे जोरदार आगमन झाले. पारध परिसरात जोरात पाऊस पडला. त्यामुळे कोरड्याठाक पडलेली रायघोळ नदी दुथडी वाहिली. राजूर परिसरात एक तास मुसळधार पाऊस पडला. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी परिसरात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले. परिसरातील ओढ्यांनाही पाणी आले. या पावसामुळे आता या भागातील पेरणीला वेग येण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.