नांदेड - नांदेडला कोरोना पॉझिटिव्हचा पहिला रुग्ण बुधवारी (ता. २२) आढळून आल्यानंतर प्रशासनाच्या वतीने तो संसर्गित कुठून झाला, याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. त्याचबरोबर कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात कोण कोण आले आहे, त्याचाही शोध घेऊन त्यांची तपासणी करणे, त्यांचे स्वॅव प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवणे आणि त्यांना क्वारंनटाइन करण्याचेही काम सुरु करण्यात आले आहे.
नांदेड शहरातील पिरबुऱ्हाणनगरच्या कंटेंटमेंट झोनमधील तीन हजार ७९ घरांमधील १३ हजार ३०९ व्यक्तींची थर्मल मशीनद्वारे गुरुवारी (ता. २३) तपासणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोरोनाबाधित व्यक्तीच्या परिवारातील आठ सदस्यांना ‘एनआरआय’ निवास येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबातील तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले असून त्यातील काहींचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत. जिल्हा प्रशासनाची गुरुवारी (ता. २३) रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती.
हेही वाचा - नांदेडकरांनो आता ‘हे’ ऐका नाहीतर...
अधिकाऱ्यांनी केली पाहणी
महापालिकेच्या क्षेत्रातील पीरबुऱ्हाणनगर येथील एका ६४ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे बुधवारी (ता. २२) कळाल्यानंतर पीरबुऱ्हाणनगर व लगतचा परिसर असलेल्या सहयोगनगर, अशोकनगर, भाग्यनगर, वृंदावन कॉलनी, उदयनगर, शास्त्रीनगर, टिळकनगर, विद्युतनगर, अंबेकरनगर, इंदिरानगरसह इतर परिसर हा कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन, महापालिका आयुक्त डॉ. सुरेश लहाने, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी करून आढावा घेतला.
कंटेंटमेंट झोनमधील नागरिकांची तपासणी
दरम्यान, गुरुवारी आयुक्त डॉ. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अजितपालसिंघ संधू, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद बदियोद्दीन, डॉ. बळिराम भुरके, डॉ. बालाप्रसाद कुंटूरकर, डॉ. कल्याण पवार यांच्यासह चार आरोग्य पर्यवेक्षक, ४० आशा वर्कर आणि ४० परिचारिका यांनी कंटेंटमेंट झोनमधील नागरिकांची तपासणी केली असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
संसर्ग कुठून झाला याचा शोध सुरू...
दरम्यान, कोरोनाबाधित रुग्ण हा कुठे गेला आणि कोणाच्या संपर्कात होता, याचा शोध प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे. कोरोनाबाधित रुग्ण कोणामुळे पॉझिटिव्ह झाला, याचा शोध अद्याप प्रशासनाला लागला नाही. त्यामुळे पुढील कार्यवाही करण्यासाठी अडचणी येत आहेत. कोरोनाबाधित व्यक्ती त्याच्या एका नातेवाइकाच्या संपर्कात आला होता आणि सदरील नातेवाइक हैदराबाद आणि पुणे येथे जाऊन आल्याची माहिती मिळाल्यानंतर उमरी येथील नातेवाईक व त्याच्या कुटुंबास क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण यांनी दिली.
हेही वाचलेच पाहिजे - Video ः जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक काय म्हणाले... नांदेडकरांनो जरुर पहा...
कोरोना विषाणू संसर्गाबाबतची माहिती
(ता. २३ एप्रिल सायंकाळी पाच वाजेपर्यंत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.