वसमत ( जिल्हा हिंगोली ) : सुप्रीम कोर्टात रद्द झालेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर हिंगोली जिल्ह्यातील मराठा बांधवांच्या मराठा आरक्षण विषयक भावना समजून घेऊन त्या पक्ष नेत्रत्वाकडे सादर करण्यासाठी वसमतच्या शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित बुलडाणा चिखली विधानसभा मतदार संघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार श्वेता महाले आल्या असता वसमत सकल मराठा समाजाच्या असंख्य बांधवांनी आपल्या आरक्षण विषयक मागणीला जोरदार मांडणी करुन मागील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती सरकारने दिलेले आरक्षण किती फसवे होते याचे अनेक सप्रमाण उदाहरणाचा पाढाच मराठा बांधवांनी त्यांच्यासमोर मांडला.
युती सरकारला मराठा समाजाच्या अभ्यासू नेत्यांनी ईसबीसी मराठा आरक्षण कोर्टात टिकणार नाही, ते देऊ नका. समाजाला आरक्षण द्यायचेच असेल तर ते ओबीसीतच द्या असे सांगून सुद्धा दगा झाला. समाजातील आरक्षणासाठी तरुणांनी दिलेले बलिदान वाया गेले. तेच आघाडी सरकारने केले. आताही आघाडी सरकार मराठा आरक्षणच्या बाजूने नाही. केंद्राने दिलेले आर्थिक दुर्बल 10 टक्के आरक्षण जे सर्व जाती धर्मातील लोकांना दिले आहे तेच पुढे करुन समाजाची फसवणूक करीत आहेत. सगळ्याच पक्षाच्या मराठा नेत्यांनी मराठा समाजाचा घोर अपमान केला आहे. आता यापुढेही समाजाची फसवणूक करायची असेल तर बंद करा हे राजकारण आशा स्वरुपाचे अनेक प्रश्न सकल मराठा समाजाच्या वतीने मांडून आपल्या तीव्र भावना मांडल्या.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात बियाणे, खते मुबलक प्रमाणात उपलब्ध- रविशंकर चलवदे
जर विदर्भातील कुणबी मराठा हा ओबीसीत असेल तर त्यांचे मराठवाड्यात सोयरे आहेत, मग आमदार श्वेता महाले जर ओबीसीत तर मराठवाड्यातील मराठा बांधव ओबीसीत का असू शकत नाहीत, मराठा आणि कुणबी एक आहेत असं जर खर आहे तर मग मराठवाड्यातील मराठा समाजावर अन्याय का होतोय असे मत उपस्थित मराठा समाजातील मान्यवरांनी मांडला.
त्यांच्यासोबत हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे, भारतीय जनता पक्षाचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष ऍड. शिवाजी जाधव, माजी आमदार रामराव वडकूते, वसमतचे माजी नगराध्यक्ष शिवदास बोडेवार, तालुका अध्यक्ष खोबराजी नरवाडे, पंचायत समितीचे उपसभापती विजयराव नरवाडे, जि. प. सदस्य नाथराव कदम, सुनील बागल, सुनील अग्रवाल, उपनगराध्यक्ष सीताराम म्यानेवार, नगरसेवक शिवाजी अडलिंगे, दिलीप पवळे, अरविंद खराटे, अक्षय भोसले, रंगनाथ देशमुख आदी उपस्थित होते.
येथे क्लिक करा - जागतिक पर्यावरण दिनापासून वृक्ष लागवड करा- सुनिल केंद्रेकर
यावेळी बोलतांना आमदार तानाजी मुटकुळे म्हणाले की, लवकर मराठा समाजाच्या आरक्षण या प्रश्नावर महाराष्ट्र सरकारचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार मिळून आपल्या प्रश्नावर नक्कीच बोलतील त्यासाठी श्वेता महाले यांचा हा दौरा आहे. यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष अॅड. शिवाजी जाधव यांनी आरक्षण या विषयावर बोलताना महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात कमी पडले आहे असे मत मांडले.
मी हिंगोली जिल्हा आणि परभणी जिल्हा सकल मराठा समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी आलो आहे. यानंतर सभागृहातील व रस्त्यावरील मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आम्ही समाजासोबत आहो. नक्कीच तुमच्या भावना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेऊन यावर लढा उभारला जाईल -मी एक मराठा म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे. गरज पडल्यास सभागृहात हा मुद्दा मी नक्कीच मांडील अशी ग्वाही त्यांनी उपस्थित सकल मराठा समाजास दिली.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.