Kidney Donate : पत्नीने स्वतःची किडनी देऊन वाचवले पतीचे प्राण; सती सावित्रीच्या कथेची प्रचिती पाहावयास मिळाली

सतयुगात राजा सत्यवानाचे प्राण पत्नी सती सावित्रीने आपल्या तपश्चर्येने यमराजाकडून परत आणले, ही कथा सर्वश्रृत आहे. याचीच प्रचिती कलियुगात पाहावयास मिळाली.
 kidney donate
kidney donateesakal
Updated on

करमाड - सतयुगात राजा सत्यवानाचे प्राण पत्नी सती सावित्रीने आपल्या तपश्चर्येने यमराजाकडून परत आणले, ही कथा सर्वश्रृत आहे. याचीच प्रचिती कलियुगात पाहावयास मिळाली. करमाड (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील सुमीत कुलकर्णी यांची किडनी निकामी झाल्याने मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या पतीला स्वत:ची किडनी दान करून जीवदान देऊन पती-पत्नीच्या नात्याचा समाजासमोर एक आदर्श ठेवला. नूतन सुमीत कुलकर्णी (वय-२८) असे किडनी दान केलेल्या या कलियुगातील सती सावित्री अर्थात पत्नीचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.