नांदेड : किनवट परिसरातील एका जंगलात गस्त घालणाऱ्या वनविभागाच्या पथकाने हल्ला चढविला. एवढेच नाही तर या वनमाफियांनी पथकातील महिला कर्मचाऱ्यांसह त्यांना मारहाण करून शासकिय कामात अडथळा निर्माण केला. ही घटना रविवारी (ता. १५) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी किनवट पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. १७) डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
रविवारी (ता. १५) डिसेंबर रोजी बोधडी (ता. किनवट) वन परिक्षेत्राचे वनपाल बाबू तुकाराम जाधव हे आपल्या पथकासह चिखली शिवारात असलेल्या वन सर्वे क्रमांक ३० मध्ये सागवान लाकडे चोरीस जात असल्याने गस्त घालत होते. हे पथक गस्तीवर असतांना त्यांच्यासमोरून सागवान लाकडे चोरून बैलगाडीतून शेख कासीम शेख जैनुन आणि शेख इद्रीस शेख जैनुन हे घेऊन जात होते. त्यांच्या बैलगाडी या पथकानी अडविली. मात्र गाडी अडविताच या सागवान माफियांनी हैदोस घालत मोठमोठ्याने आरडा ओरडा केला.
हेही वाचा--साडेतीन किलो ‘हा’ अमली पदार्थ जप्त
चिखली परिसरातील जंगलातील घटना
या घटनेनंतर चिखली गावातील काही मंडळी जंगलाकडे धावत आली. यावेळी आरोपीनी पथकातील कर्मचारी व महिला कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. यावेळी आरोपीतांनी जंगल तुम्हारे बाप का है क्या ? जंगल हमारी रोजी रोडी है, अगर तुम हमारे गाडी के सामने आये तो तुम्हे जानसे मार देंगे असे म्हणून लाथबुक्यानी मारहाण केली. तसेच शासकिय कामात अडथळा निर्माण केला. ठार मारण्याची धमकी दिली. एवढा प्रकार झाल्यानंतरही त्यांनी तोडलेली सागवान झाडे चोरून नेली. बाबू जाधव यांच्या फिर्यादीवरुन किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक मारोती थोरात करीत आहेत.
एकदा उघडून तर पहा --श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत भव्य कृषि प्रदर्शन
वनमाफियांची गुंडागर्दी
किनवट व माहूर परिसरात घनदाट जंगल असल्याने वनमाफिया सक्रीय असतात. या जंगालातून वनसंपती पळविण्याचा ते प्रयत्न करतात. एवढेच नाही तर सागवान, चंदन आदी किंमती वृझांची कत्तल करुन आपले उखळ पांढरे करुन घेतात. तसेच वन्य प्राण्यांचे काही अवशेषसुध्दा या भागातून तस्करी केल्या जाते. या तस्करांवर करडी नजर ठेवणाऱ्या वनविभागाच्या पथकावर यापूर्वीही अनेकवेळा प्राणघातक हल्ले करण्यात आले आहे. असाच हल्ला पुन्हा चिखली (ता. किनवट) परिसरातील जंगलात करण्यात आला. विशेष म्हणजे पथकातील महिलांनाही मारहाण करण्यात आल्याने वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी वनमाफियांच्या त्रासाला कंटाळून जात आहेत. वनविभागाच्या पथकावर होणारे हल्ले थांबवावेत अशी मागणी करण्यात येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.