औसा, (जि. लातूर) - लातूर जिल्ह्यात प्रचारासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टर तसेच त्यांच्या बॅगांची निवडणूक विभागाच्या पथकाने तपासणी केली. यावेळी ठाकरे यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. पंतप्रधानांच्याही बॅगा तपासणार का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.