महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारने अनेक लोकोपयोगी योजना आणताना सर्व समाजघटकांचा विकास साधला आहे. शेतकर्यांची मागणी लक्षात घेता महाराष्ट्रात आगामी काळात वर्षभराच्या आत आठही दिवस दिवसा वीज पुरवठा सुरु करणार असल्याचे सांगून सोलारच्या कामाला आदेश देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
बुधवारी सायंकाळी पाच वाजता जनसन्मान यात्रा वसमत येथे पोहचली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जिंतूर टी पाँइंट ते सभेच्या ठिकाणापर्यंत मोटारसायकल रँली काढून जल्लोषात स्वागत केले. या वेळी आयोजित सभेला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार राजु भैय्या नवघरे, आमदार विक्रम काळे, युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण, आमदार राजेश विटेकर, जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर आदींची उपस्थिती होती.