Suresh Birajdar: सुरेश बिराजदारांना मिळणार विधानपरिषदेवर संधी? अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष

Dharashiv politics: प्रचारादरम्यान जाहीर सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रा. बिराजदार यांना विधान परिषदेवर संधी देण्याची घोषणा केली होती
सुरेश बिराजदारांना मिळणार विधानपरिषदेवर संधी? अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
Suresh Birajdarsakal
Updated on

Umraga Latest Update: धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश (दाजी) बिराजदार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून चर्चिली जात आहे. प्रा. बिराजदार निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.

शिवाय त्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी केली होती मात्र ऐनवेळी बदलत्या घडामोडीत त्यांना डावलण्यात आल्याने उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी विधान परिषदेवर संधी देण्याचे आश्वासन दिल्याने कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सुरेश बिराजदारांना मिळणार विधानपरिषदेवर संधी? अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
Suresh Birajdar : संघर्षाच्या काळात अजित पवार यांच्या पाठीशी शक्ती उभारण्याची गरज

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला विधान परिषदेच्या तीन जागा तर राज्यसभेच्या दोन जागा येत आहेत, त्यात विधान परिषदेच्या तीन जागांपैकी एका जागेवर धाराशिव येथील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जाहीर सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रा. बिराजदार यांना विधान परिषदेवर संधी देण्याची घोषणा केली होती.

धाराशिव लोकसभेसाठी अजित पवार यांनी प्रा. बिराजदार यांना तयारी करण्याची सूचना देत सहा महिन्यापूर्वीच कामाला लावले होते त्यानुसार बिराजदार यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. पण राजकीय घडामोडीत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी देऊन श्री. बिराजदार यांना थांबण्यास सांगण्यात आले. श्री. पवार आदेशाप्रमाणे त्यांनी पक्षाचे एकनिष्ठ पणे कामही केले.

सुरेश बिराजदारांना मिळणार विधानपरिषदेवर संधी? अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
Who is Suresh Gopi: अभिनेता ते नेता... केरळातील भाजपचे पहिले खासदार कोण? जाणून घ्या...

मागील ४० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहुन माजी आमदार (कै.) भाऊसाहेब बिराजदार यांचा राजकीय वारसा समर्थपणे चालवणाऱ्या तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादीवर आलेल्या संकट समयी खंबीरपणे पक्षाशी साथ देत पक्षाला उभारी दिली. अडचणीत आलेली जिल्हा बँक वाचवण्यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न.

धाराशिव जिल्ह्यामध्ये बेरोजगार व्यवसायिक यांच्यासाठी उभारलेले भाऊसाहेब बिराजदार बँक तसेच समुद्राळ येथे उभारलेला भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना यामुळे चार तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणारा मोठा फायदा व पक्ष अडचणीत असताना पक्षाची घेतलेली जबाबदारी समर्थपणे पार पडल्याने प्रा. बिराजदार यांना विधान परिषदेवर संधी मिळावी असे कार्यकर्त्यांना वाटत आहे.

सुरेश बिराजदारांना मिळणार विधानपरिषदेवर संधी? अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
Suresh Raina: रैनाने शाहिद आफ्रिदीच्या सांगण्यावरून ट्वीट केलं डिलीट? पाकिस्तानचा माजी कर्णधाराचा दावा; जाणून घ्या प्रकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.