मरावे परी कीर्ति रुपी उरावे ! वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी देहदान

'दुःखाचे कुठलेच भांडवल न करता, माझा देह मेडिकलच्या विद्यार्थ्याच्या अभ्यासासाठी कामा येईल.'
Dead Body Donation And Jalna News
Dead Body Donation And Jalna Newsesakal
Updated on

जालना : शहरातील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात चार दशकांपासून अविरत कार्य करणाऱ्या विजया दिनकरराव अंबेकर (वय ८४) यांचे मंगळवारी (ता.आठ) निधन झाले. निधनानंतरचे कुठलेच सोपस्कार करायचे नसून माझा देह वैद्यकीयच्या विद्यार्थ्याच्या अभ्यासासाठी दान करा, असा निर्णय विजयाताई यांनी आठ वर्षापूर्वीच केला होता.औरंगाबाद (Aurangabad) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान प्रक्रिया मंगळवारी पार पडली. देहदानाच्या निर्णयाने अंबेकर कुटूंबाने नवा विचार पुढे आणला, हे विशेष. शहरात १९६६ दरम्यान जुना जालन्यात महिला मंडळाची स्थापना विजया अंबेकर यांनी केली होती. महिला मंडळातर्फे बालविकास शाळा सुरुवात करण्यात मोठा पुढाकार होता. (Woman Donated Her Dead Body For Medical Students In Jalna)

Dead Body Donation And Jalna News
Abdul Sattar|औरंगाबादचे आगामी खासदार चंद्रकांत खैरेच असणार - अब्दुल सत्तार

इनरव्हील क्लब, ब्राह्मण सभा, महिला मंडळ, राष्ट्र सेविका समिती अशा संस्था, संघटनेत विजयाताईचा पुढाकार असायचा. आई वडील शिक्षक असल्याने लहानपणापासून विजयाताई यांच्या मनावर मूल्यसंस्कार रुजविले गेले. त्याकाळी १९५४ मध्ये विजयाताई बीएची पदवी प्राप्त केली होती. जालना (Jalna शहरात आल्यानंतर शिक्षण, सामाजिक कार्यात पुढाकार घेत असत. अनिष्ट प्रथा, परंपरा काळानुसार बदलल्या पाहिजे, माणसाने कधीही दुःखाचे भांडवल करू नये, असा विचार विजयाताई आपल्या कृतीतून देत असल्याची आठवण परिवारातील सदस्य सांगतात. जालन्यातील महिला चळवळीत विजयाताई नेहमीच पुढाकार घेत असत,असे सामाजिक कार्यकर्ते रमेश देहेडकर यांनी सांगितले. निधनानंतर कुठलेच सोपस्कार न करता आईची अंतिम इच्छा डॉ. माधव अंबेकर यांनी पूर्ण केली. औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदानाची (Dead Body Donation) प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यासाठी जालन्यातील पॅथॉलॉजिस्ट डाॅ.शेजूळ, औरंगाबाद घाटी रुग्णालयातील अधिष्ठाता डाॅ. वर्षा काकीनाडकर, डाॅ.लईक, डाॅ.प्रतिमा कुलकर्णी, डाॅ.प्रिया वट्टमवार यांच्या टीमने देहदान प्रक्रिया पूर्ण केली.

Dead Body Donation And Jalna News
कोरोना काळात कुणी काय केलं, चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला सवाल

आमच्या आईने आठ वर्षापूर्वीच देहदानाचा निर्णय घेतला होता. दुःखाचे कुठलेच भांडवल न करता, माझा देह मेडिकलच्या विद्यार्थ्याच्या अभ्यासासाठी कामा येईल, असे सांगितले होते. औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात देहदान केला आहे.

डाॅ. माधव अंबेकर, जालना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()