केज - शेतात एका महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच खून केल्याची घटना शनिवारी (ता. ३१) रोजी दुपारी केज तालुक्यातील आनंदगाव (सारणी) येथे घडली. खून करून तो पळून जात असताना त्या खूनी पतीस पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. भरदिवसा घडलेल्या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.