लातूर - सधन व्यक्तींना हेरून ती त्यांच्याशी लगट करायची. नंतर शारीरिक संबंधही ठेवायची. याच वेळी कॅमेऱ्याद्वारे खासगी क्षणाचे चित्रीकरण करून नंतर संबंधित व्यक्तीला चित्रफीत पाठवायची. त्या आधारे ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळायची. अशा प्रकारे तिने तब्बल 15 जणांना गंडविले. अहमदपूर पोलिसांनी तिच्या साथीदारासह तिला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता विजय मस्के (रा. अहमदपूर) आणि राजू किशन जाधव अशी संशयिताची नावे आहेत. सुनीता ही शहरातील श्रीमंत लोकांशी लगट करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत होती. तिने अनेक प्रतिष्ठितांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर हॉटेल, लॉज किंवा इतर ठिकाणी त्या व्यक्तीशी शरीर संबंध ठेवून त्याच्या चित्रफिती तयार करीत या चित्रफितीच्या आधारे राजू जाधव याच्या मार्फत ती संबंधित व्यक्तीला गाठून अश्लील चित्रफितीच्या माध्यमातून तिला ब्लॅकमेल करत लाखो रुपयांची खंडणी मागत होती. अशा प्रकारे तिने शहरातील तब्बल 15 जणांकडून पैसे उकळले.
हेही वाचा - Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी
देत होते धमकी
एखाद्या व्यक्तीला जाळ्यात ओढले की सुनीता मस्के ही त्याला लॉजवर अथवा घरी बोलावून त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवायची. हे करताना त्याचे चोरून चित्रीकरण केले जायचे. नंतरच राजूच्या मदतीने संबंधित व्यक्तीची भेट घेऊन चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत देत त्या व्यक्तीला ब्लॅकमेल केले जायचे. या दोघांनी अहमदपूर शहरातील सर्व स्तरातील किमान पंधरा जणांना लाखो रुपयांचा गंड घातला आहे.
क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी
असे पकडले पोलिसांनी
काही दिवसांपूर्वी या महिलेने एका शिक्षकासोबत अशाच प्रकारे शारीरिक संबंध बनवले आणि त्याला चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत 20 लाखांची मागणी केली. त्या शिक्षकाने ही माहिती आपले नातेवाईक असलेल्या थोडगा येथील सरपंच शिवाजी खांडेकर यांना दिली. त्या महिलेने सहमतीने शारीरिक संबंध ठेवल्याचे त्या शिक्षकाने खांडेकर यांना सांगितले.
मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...
खांडेकर यांनी हा प्रकार पोलिस उपअधीक्षक अश्विनी पाटील यांना सांगितला. त्यांनी रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचण्याचे ठरवले. शिक्षकाकडून घ्यावयाच्या 20 लाखांच्या रकमेची तडजोड होऊन 8 लाख देण्याचे ठरले. त्यापैकी 2 लाखांची रक्कम बुधवारी सकाळी एका शाळेच्या मैदानात स्वीकारण्यासाठी सुनीता मस्के आणि राजू जाधव हे दोघे तिथे आले. त्यांनी पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्या दोघांनाही रंगेहाथ पकडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.