"स्त्री शक्ती सर्वात मोठी शक्ती आहे आणि तिनं ठरवलं तर कुठलीही क्रांती घडू शकते"

खा. फौजिया खान यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न
Dr Fouzia Khan
Dr Fouzia Khansakal media
Updated on

झरी : "स्त्री शक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे आणि तिनं ठरवलं तर कुठलीही क्रांती घडू शकते. त्यांनी आपल्या पाल्यांना शिकवलं पाहिजे त्यासाठी गावाला हवं ते सहकार्य करणार." असे मत खा. डॉ फौजिया खान यांनी व्यक्त केलं आहे. स्त्री शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दरम्यान, मा. खा. डॉ. फौजिया खान (Dr fouzia khan) यांना संसदरत्न पुरस्कार (Sansad ratna Awards) प्राप्त झाल्याबद्दल शिवसेना (shivsena) शाखा झरी (zari) तर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

Dr Fouzia Khan
गर्व आहे मला अलिबागकर असल्याचा; माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांची प्रतिक्रिया

स्त्री शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे प्रथम नागरिक सरपंच दिपकराव देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खा. डॉ फौजिया खान उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन ग्रा. पं. सदस्यता डी. के. इनामदार यांनी केले होते तर उदघाटक म्हणून शिवसेना नेते गजाननराव देशमुख यांची उपस्थिती होती.

इंजि. प्रल्हाद होगे पाटील यांनी शिक्षणाचे महत्व सांगत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शिवसेना नेते गजाननराव देशमुख यांनी गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राबाबात सदैव सहकार्याची भावना दाखवल्याबद्दल खा. फौजिया खान यांचे आभार व्यक्त केले. "स्त्री शक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे आणि तिनं ठरवलं तर कुठलीही क्रांती घडू शकते. त्यांनी आपल्या पाल्यांना शिकवलं पाहिजे त्यासाठी गावाला हवं ते सहकार्य करणार." असे मत खा. डॉ फौजिया खान यांनी व्यक्त केले. यावेळी खा.फौजिया खान यांना केक भरवून त्यांचा वाढदिवस साजरा केला व सन्मान म्हणून खोबरा लाडू तुला सुद्धा करण्यात आली.

यावेळी जि.प. सदस्य अर्चनाताई देशमुख,ग्रा. पं सदस्य सुनीलराव देशमुख, नारायण गवळी,गोदावरी लिंबाजी अंभोरे, ज्योतीताई हेंडगे तसेच बेबीताई देशमुख,शिवसेना शाखाप्रमुख आबासाहेब चौधरी,माजी सरपंच सुदाम सोनवणे, सोसायटी चेअरमन अशोकराव घुले, सत्तार कुरेशी, भरत देशमुख व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश अण्णा देशमुख यांनी तर अध्यक्षीय समारोप दिपकराव देशमुख यांनी केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी. के. इनामदार, योगेश शिरडकर, बाळासाहेब गवळी,इबु इनामदार, रहीम इनामदार, भगवान जगाडे आदींनी परिश्रम घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()