पाणी पट्टी, घरपट्टी या करांच्या वसुलीच्या नावावर कर्मचारी दिवसभर घर कामे करण्यात व्यस्त आहेत. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतांना संबंधित अधिकारी दिसत आहेत.
सेलू (जि. परभणी) - सेलू नगरपालिकेची (Selu Nagarpalika) मुदत संपुष्टात आल्यामुळे व पंचवार्षिक निवडणूक (Election) लांबणीवर पडल्यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे तत्परतेने व्हावे. या करिता शासनाच्या वतीने प्रशासकांची (Administration) नेमणूक केली जाते. मात्र नेमलेला प्रशासकच कामे प्रलंबित ठेवत असेल तर सामान्य नागरिकाने कोणाकडे दाद मागावी? असा यक्ष प्रश्न सेलूकरांना पडला आहे.
शहरातील स्वच्छता, पाणी, पथदिवे या दैनंदिन कामाची पूर्णतः वाताहत होत असतांना सर्वसामान्य नागरिकांना रहिवाशी प्रमाणपत्र ते नामांतर नक्कल या करिता नगर पालिका कार्यालयात दररोज खेटे मारावे लागत आहेत.
पाणी पट्टी, घरपट्टी या करांच्या वसुलीच्या नावावर कर्मचारी दिवसभर घर कामे करण्यात व्यस्त आहेत. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतांना संबंधित अधिकारी दिसत आहेत. सेलू नगर पालिकामध्ये स्थानिक आणि मर्जीतील कर्मचाऱ्यांचा भरणा असल्यामुळे लोकप्रतिनिधींची कामे मार्गी लावून हुजरेगिरी करण्यात कर्मचारी धन्यता मानत आहेत. सेलू नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम विस्कळीत झाल्यामुळे प्रशासक म्हणून नेमलेल्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी असतांना मूलभूत सुविधेसह सर्वसामान्य नागरिकांची कामे खोळंबलेली आहेत. प्रशासकांच्या ढिसाळ आणि सुस्त नियोजनामुळे कर्मचाऱ्यांची मजा आणि सामान्य नागरिकांना सजा घडत आहे.
सेलू शहरातील अनेक भागातील पथदिवे मागील अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असून पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. तसेच दररोज घरासमोर येणारी घंटा गाडी आता दोन ते चार दिवसाआड येत असल्याने शहरातील अनेक भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मागील काळात शहरातील सुरू असलेली विकासकामे मंजूर होऊन सुद्धा ठप्प झालेली दिसत आहेत. सेलू नगर पालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधा जर नागरिकांना वेळेत मिळत नसतील आणि दररोज खाजगी कामासाठी नगर पालिका कार्यालयात खेटे मारावे लागत असतील तर मग शासनाच्या वतीने नेमलेला प्रशासक हवा कशाला? हा यक्ष पश्न सर्वसामान्य सेलूकरांना पडला आहे.
सेलू नगर पालिकेची मुद्दत संपल्यानंतर (ता. २९) डिसेंबर २०२१ रोजी येथिल उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार यांची सेलू नगर पालिकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. परंतु त्यांचेकडे महसूल विभागीचीच कामे मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांना शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, शहराची विकास कामे याकडे बघण्यासाठी वेळत मिळत नसावा. अशी उपरोक्त प्रतिक्रिया "सकाळ" शी बोलतांना येथिल मोरया प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अभिजित राजूरकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.