बुथ कमेटीच्या माध्यमातून पक्ष बळकट करण्यासाठी काम करा- जयंत पाटील

येथील प्रसाद गार्डन मंगल कार्यालयात राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जयंत पाटील वसमतमध्ये
जयंत पाटील वसमतमध्ये
Updated on

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : मतदारसंघात तळागाळापर्यंत काम करण्यासाठी बुथ कमेट्या स्थापन करून पक्ष संघटन वाढवा असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मंगळवार ( ता. २९) केले.

येथील प्रसाद गार्डन मंगल कार्यालयात राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजू नवघरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षना सरगर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष नरेंद काळे, जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, महिला प्रदेश सचिव रत्नमाला शिंदे, मुनिता जाधव यासह मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा - चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडले आहे. घटनास्थळी पोलिस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी भेट देवुन तपासा संदर्भात सुचना केल्या आहेत.

यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी औंढा तालुका व वसमत तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. तालुका अध्यक्षापासून बुथ कमेटी अध्यक्षापर्यंत पक्ष संघटन व मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. उपस्थिती पदाधिकारी यांनी माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर व आमदार राजू नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली मजबूत पक्ष संघटनांचे काम सुरु असल्याची ग्वाही दिली.

प्रदेशाध्यक्ष प्रत्यक्ष संवाद साधत असल्याने पदाधिकाऱ्यांनी तालुका, गट, गण, शहर व बुथमधील पक्ष संघटन बाबत कथन केले. प्रश्नोत्तराच्या संवादानंतर जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, जिथे संघटन मजबूत तिथे पक्ष मजबूत, जिथे कार्यकर्ते मजबूत तेथे नेता मजबूत असतो. म्हणून मतदारसंघात पक्ष व आपला नेता बळकट करण्यासाठी तळागाळापर्यंत बुथ कमेट्या स्थापन करा. एवढेच नाही तर प्रत्येक बुथमधील नागरिकांच्या समस्या समजुन घेऊन त्या सोडविण्याचे काम करा असे आवाहन त्यांनी केले.

येथे क्लिक करा - काँग्रेसचे माजी खासदार अॅड. तुकाराम रेंगे पाटील यांच्या अमेयनगर येथील निवासस्थानी श्री. चव्हाण पत्रकारांशी बोलत होते

आमदार राजू नवघरे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की, तुम्ही आम्हाला उमदा युवक आमदार निवडून दिला त्यामुळे आम्ही त्यांना सर्वोत्परी मदत करणार असल्याचे सांगीतले. कोरोना काळ संपल्यानंतर अनेक विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी वसमतला येणार असल्याचे जयंत पाटील व धनंजय मुंडे यांनी सांगितले. यावेळी माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर, दिलीप चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन गजानन ढोरे यांनी केले. कार्यक्रमासाठी विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत बागल, बालू ढोरे, जिजा हरणे, गोरख पाटील, दौलतराव हुंबाड, शहराध्यक्ष शेख अयुब, तान्हाजीराव बेंडे, अंबादास जाधव आदींनी पुढाकार घेतला.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.