World Telecommunication Day : मोबाइलमुळे क्रांती, आता 'फाइव्ह जी'कडे वाटचाल

ग्रामीण भागाच्या विकासातही दूरसंचार क्षेत्र हितकारक
World Telecommunication Day
World Telecommunication Daysakal
Updated on

भोकरदन : तार, दूरध्वनीनंतर मोबाईल क्रांती झाली. ग्रामीण भागातही दूरसंचार सुविधा सहज उपलब्ध झाली. लॅन्डलाईनपासून सुरू झालेला हा प्रवास मोबाईल, इंटरनेट आणि आता ऑप्टिक फायबर, वायरलेस इंटरनेट,फाईव्ह जीपर्यंत पोचला आहे. अर्थात या वाटचालीचा अनेकांवर साधक-बाधक परिणामही दिसून आला. दरवर्षी ता. १७ मे हा जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्यात येतो.

तत्कालीन माहिती व दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन यांनी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमध्ये दूरसंचार क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावली. एकेकाळी फक्त खास लोकांकडे असणारा मोबाईल सामान्य शेतकरी मजूर व मध्यमवर्गीयांकडे कसा येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

प्रमोद महाजन यांनी देशात मोबाईल सेवेचे जाळे विस्तारण्यात मोठा वाटा आहे, इन्कमिंग फ्री ची सुरुवात देखील त्यांनीच केली होती. आज सर्वसामान्यांना इंटरनेट देखील अल्प दरात उपलब्ध झाले असून देश आता ५ जी नेटवर्क कडे वाटचाल करीत आहे.

— रावसाहेब दानवे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री

World Telecommunication Day
5G Network : ‘जीडीपी’त दोन टक्के योगदान

आता फायबर ऑप्टिकचे जाळे गावोगाव पसरत आहे. मोबाईल ,इंटरनेट, लॅन्डलाईन कनेक्शन व टीव्ही या सर्व गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवर देऊन ग्राहकांसाठी चांगली संधी उपलब्ध झालेली आहे यामुळे वेळ व पैशाची मोठी बचत होणार आहे.

— प्रतीक देशमुख,व्यावसायिक, भोकरदन

भारत संचार निगमने जुन्या कॉपर लाईन फायबर ऑप्टिकमध्ये परावर्तित करून फायबर टेक्नॉलॉजी टू होम (एफ टी टी एच ) च्या माध्यमातून ग्राहकांना अत्यंत वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली आहे. बीएसएनएलने सर्व ग्रामपंचायती हाय स्पीड इंटरनेटच्या माध्यमातून आधीच जोडलेल्या आहेत. लवकरच तालुक्यातील मोहोळाई,मालखेडा व तांदुळवाडी येथे सौर ऊर्जेवर चालणारे फोरजी तंत्रज्ञान युक्त मोबाईल टॉवर कार्यान्वित होतील.

— वसंत हलगे, उपमंडळ अभियंता, बीएसएनएल, भोकरदन

World Telecommunication Day
OnePlus 11 5G Jupiter Rock Edition : या स्पेशल एडिशन मध्ये आहेत खास गोष्टी

वर्ष २००५ ते २०१० कॉइन बॉक्स चा काळ होता. शहरात तसेच खेड्यापाड्यावर अनेक ठिकाणी कॉइन बॉक्सचे फोन होते. दररोज शेकडो कॉइन बॉक्स फोन दुरुस्तीसाठी येत. तेव्हा ३ हजार १०० रुपयात कॉइन बॉक्सची जोडणी मिळत असे. तर तीस रुपयात कॉइन बॉक्सची दुरुस्ती करून देण्यात येत असे.

— ईश्वर इंगळे, कॉइन बॉक्स फोन तंत्रज्ञ, भोकरदन

World Telecommunication Day
Water scarcity : जालना जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा; १० गावांसह चार वाड्यांना ११ टॅंकरने पाणीपुरवठा

वर्ष १९९५ मध्ये माझ्या वडिलांनी भोकरदन शहरात एसटीडी पीसीओची सुरुवात केली होती. साधारण दहा वर्ष एसटीडी पीसीओ आम्ही यशस्वीरीत्या चालवला. त्यावेळेस फोन करणाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी राहत असे. दूरच्या नातेवाईकांशी बोलण्यासाठी अनेक जण रांगेत उभे राहत होते. मोबाईल फोन क्रांतीनंतर हे चित्र बदलले.

— विष्णू मिरकर, एसटीडी पीसीओ चालक, भोकरदन

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी ९० च्या दशकात संगणकीकरणाची सुरुवात केली. आज दूरसंचार क्षेत्रात इंटरनेट ला फार महत्त्व आले आहे सोशल मीडिया हे एक नवीन क्षेत्र आज उपलब्ध झाले आहे.

— सोपान सपकाळ, काँग्रेस सोशल मीडिया सेल प्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.