यंदा हाताला मेंदी नव्हे, सॅनिटायझर लावण्याची वेळ, लग्नाळूंचा हिरमोड... 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Updated on

टाकरवण (जि. बीड) - कोरोना विषाणूमुळे लग्नसोहळ्याचे मंगलमय सूर बेसूर झाले असून, मंगल कार्यालय व लॉन्सचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगल कार्यालय व्यवसायाशी निगडित असणाऱ्या घटकांना खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे. विवाहेच्छुकांवर यंदा हाताला मेंदी नव्हे, तर सॅनिटायझर लावण्याची वेळ आली आहे. 

कोरोनाचे वादळ जगभर पसरले आहे. सध्या २१ दिवसांचे 'लॉकडाऊन' असल्याने व्यवसाय आणि उद्योगांना कुलूप लागले आहे. मंगल कार्यालय व लॉन्समध्येही शुकशुकाट आहे. कोरोनापासून खबरदारी म्हणून विवाह सोहळे पुढे ढकलण्यात आले आहेत. यामुळे कोट्यवधी रुपयांत होणारी उलाढाल ठप्प झाली आहे. याचा फटका विवाह सोहळ्याशी निगडित असणाऱ्या अन्य व्यावसायिक व छोट्या घटकांना बसला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत घरगुती विवाह सोहळे पार पाडण्याचे नियोजन केले जात आहे. मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात असे घरगुती विवाह सोहळे संपन्न झाले. 

हेही वाचा - तुमचा विवाह कधी झालाय...बघा जमतेय का काही...

कोरोनामुळे विवाह सोहळे पुढे ढकलले जात असून, मार्च, एप्रिल व मे महिन्यांमध्ये बुकिंग केलेल्या तारखा रद्द केल्या जात आहेत. यापूर्वी तारीख रद्द झाल्यास ॲडव्हान्स म्हणून जमा केलेल्या रकमेतून ५० टक्के रक्‍कम मंगळ  कार्यालयचालक परत देत नसत. तथापि कोरोना आपत्तीमुळे मंगल कार्यालय मालकांना भरलेली पूर्ण रक्‍कम परत करावी लागत आहे. यामुळे मोठ्या मंगल कार्यालयचालकांचे मोठे नुकसान होत आहे. 

हेही वाचा - परीक्षा संपेपर्यंत तिला या दुःखाची कल्पनाच नव्हती...

कापड व्यावसायिकांनाही मोठी झळ 
वधू-वरांपासून ते जवळच्या वऱ्हाडी मंडळींसाठी रेडिमेड कपडे घेण्याचे नियोजन केले जाते. विवाह सोहळ्यांवर या मार्केटचे मोठे बजेट असते. आहेर म्हणून देण्यात येणाऱ्या साड्या व इतर वस्तू खरेदी रद्द झाल्याने कापड दुकानदार व रेडिमेड कपडे विक्रेते हतबल झाले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.