जिंतूर - शनिवारी (ता. १९) तालुक्यातील येलदरी येथील धरणाचे शनिवारी (ता. १९) सायंकाळी चार वाजता दहा वक्रदरवाजे उघडून त्याद्वारे २१ हजार १०० आणि जलविद्युत निर्मिद्वारे २६०० असा एकूण २३ हजार ७०० क्युसेक्स विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. .तीन दिवसापूर्वी धरणाच्या उर्ध्व भागातील खडकपूर्णा धरणातून विसर्ग बंद झाल्याने बुधवारी (ता.१६) सकाळी येलदरी धरणाचे देखील दोन दारे बंद करण्यात आले होते. त्यांनतर पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने तसेच खडकपूर्णा प्रकल्पातील विसर्ग वाढल्याने जलाशयाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली.त्यामुळे शुक्रवारी (ता. १८) मध्यरात्री येलदरी धरणाचे दोन दरवाजे (क्र.एक व दहा) ०.५ मीटरने उघडून त्याद्वारे व विद्युत निर्मितीद्वारे २६०० असा ६८२० क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडला जात असे परंतु जलाशयाच्या पाणीसाठा सतत वाढत असल्याने शनिवारी (ता.१९) सकाळी आणखी दोन दारे (क्र.पाच व सहा) ०.५ मीटर उघडण्यात आले. तर सायंकाळी चार वाजता उर्वरित सहाही दरवाजे ०.५ मीटर उघडण्यात आले..त्यामुळे सर्वच्या सर्व दरवाजातून २१,१०० आणि जलविद्युत निर्मितीद्वारे २६०० असा एकूण २३,७०० क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात चालू करण्यात आला असल्याची माहिती संबंधित विभागाची आहे.सद्यस्थितीत येलदरी धरणाच्या जलाशयातील पाणीसाठा पूर्ण क्षमतेने भरला असून पाणीपातळी नियंत्रित राहण्यासाठी विसर्ग सोडण्यात येत आहे.यावेळी नदीपात्रात खळाळून वाहत असलेल्या पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी धरणासमोर पुलाच्या रस्त्यावर बघ्यांची गर्दी होत आहे.दरम्यान, धरणात होणारी पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल, तेंव्हा नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे असा इशारा येलदरी धरण पूर नियंत्रण कक्षातर्फे देण्यात आला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.