Beed : योगेश्‍वरी देवीचा सोमवारपासून दसरा महोत्सव

दोन वर्षांनंतर उत्साहात साजरा होणार नवरात्रोत्सव : देवल समितीकडून जय्यत तयारी
beed
beedsakal
Updated on

अंबाजोगाई : राज्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या योगेश्वरी देवीचा दसरा महोत्सव (नवरात्र) सोमवारपासून सुरू होत आहे. मागील दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधामुळे या महोत्सवाचा भाविकांना आनंद घेता आला नाही. यंदाचा महोत्सव मात्र निर्बंधमुक्त साजरा होणार असल्याने मंदिरात जय्यत तयारी सुरू आहे.

अंबाजोगाईकरांचे ग्रामदैवत व कोकणस्थांची कुलदेवता असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्रोत्सवाला सोमवारी घटस्थापनेने प्रारंभ होईल. या महोत्सवानिमित्त राज्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. त्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराची स्वच्छता करून मंडप टाकणे, विद्युत रोशणाई यासह इतर कामांची जय्यत तयारी सुरू आहे.

या नवरात्रात भाविक नऊ दिवसांचे उपवास करतात, काही जण देवीच्या दर्शनासाठी पायी येतात. मागील दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधामुळे हा महोत्सव साध्या पद्धतीने साजरा झाला होता. यंदा मात्र उत्साह आहे. त्या अनुषंगाने योगेश्‍वरी देवल समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीचे सचिव ॲड. शरद लोमटे यांनी दिली.

देवीचा अवतार व उत्सव

योगेश्वरी महात्म्यानुसार अनादीकाळी दंतासूर राक्षसाचा वध करण्याच्या हेतूने योगेश्वरी देवीचा अवतार झाला. या दंतासुराच्या राजधानीचे ठिकाण बर्दापूर येथे होते. त्याने या परिसरात उच्छाद मांडला होता. त्यामुळे भक्तांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी योगेश्वरी देवीने अवतार धारण करून दंतासुराचा वध केला. त्यानंतर योगेश्वरी देवीने या ठिकाणी कायमचे वास्तव्य केल्याने.

सोमवारपासून योगेश्‍वरी देवीचा दसरा महोत्सव

जयंती नदीच्या काठी भक्तांनी हे देवीचे हेमाडपंती मंदिर बांधले. ही देवी कुमारिका असल्याने तिची कुमारिका अवस्थेतील पूजा व आराधनाही केली जाते. ही देवी कोकणातून आल्याने ती कोकणस्थांची कुलदेवता व अंबाजोगाईकरांची ग्रामदेवता आहे. वर्षभरात देवीचे दोन उत्सव होतात. त्यात अश्वीनमासी शुध्द प्रतिपदा व मार्गशीर्ष महिन्यात योगेश्वरीचा मुख्य उत्सव होतो. या दोन्ही उत्सवात देवीची घटस्थापना होऊन अष्टमी व नवमीला होमहवन करून होम कुंडात वर्णी दिली जाते. हा पूर्वापार चालत आलेला धार्मिक विधी आहेत. याशिवाय देवीची अलंकारपूजाही होते. मार्गशीर्ष उत्साहात देवीला नवस करणाऱ्या महिला दहा दिवस मंदिरातच आराध म्हणून बसतात. हे या उत्सवातील वेगळेपण आहे. दसऱ्याला योगेश्वरी देवीच्या मूर्तीची सीमोल्लंघनासाठी पालखीतून मिरवणूक निघते. त्यात आराधी महिला देवीची आराधना करणारी गीते सादर करतात.

मुख्य मंदिराला तिन्ही बाजूंनी दरवाजे

योगेश्वरीचे मंदिर पुराणकाळापासून येथे अस्तित्वात आहे. मंदिर बांधकामाचा निश्चित कालावधीचा उल्लेख सापडतात नाही. मात्र या मंदिराची रचना हेमाडपंती असल्याने यादवांच्या काळात ते बांधले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो. मुख्य मंदिर उत्तराभिमुख असून प्रवेशासाठी दक्षिण व पश्चिम दिशेला महाद्वार आहेत. मुख्य मंदिराला तिन्ही बाजूंनी दरवाजे आहेत, यातील पूर्व व उत्तर बाजूच्या दरवाजांचा भक्तांसाठी वापर होतो. देवीच्या मुख्य मंदिरावर उंच असे वैभवशाली शिखर आहे. इतर चार शिखरे हेमाडपंती बांधकाम असलेली आहेत. मुख्य शिखरावर देवदेवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. देवीच्या मुख्य गाभाऱ्यात योगेश्वरी देवीचा तांदळा (मूर्ती) आहे.

यादवांच्या काळातील मंदिर

शरद हेबाळकर, इतिहास तज्ज्ञ : साधारण आठव्या शतकात अंबाजोगाई परिसरात कल्याणीच्या चालुक्यांचे राज्य होते. याचा पुरावा अंबाजोगाई परिसरात सापडलेल्या शिलालेखात देता येतो, कारण चालुक्यांचे राज्यपाल सामंत यांचा या शिलालेखात उल्लेख आहे. त्यानंतर यादवांचे राज्य आले. नंतर १२ व्या शतकात यादवांचे राज्य येथे होते. त्यामुळे या योगेश्वरी मंदिरातील स्तंभावरून हे मंदिर यादवांच्या काळात बांधले असावे. देवीचे पीठ मात्र प्राचीन आहे. मात्र हे मंदिर नेमके कोणी बांधले याचे पुरावे कुठेच आढळले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.