Beed crime : गावठी पिस्तुलासह तरुणाला पकडले

Beed crime : जालना रोडवरील एका हॉटेलसमोर विनापरवाना गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. शिव सुनील खोसे याच्याकडून गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आला.
Beed Crime
Beed Crimesakal
Updated on

बीड : कमरेला विनापरवाना गावठी पिस्तूल घेऊन एक तरुण फिरत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जालना रोडवरील एका हॉटेलसमोर कारवाई करत त्याला जेरबंद केले.

शिव सुनील खोसे (रा. माळीवेस, बीड) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त केले. जालना रोडवरील एका हॉटेलसमोर उभा असलेल्या शिव खोसे याच्या कमरेला गावठी पिस्तूल असल्याची माहिती खबऱ्याने पोलिस हवालदार अशोक दुबाले यांना दिली.

दुबाले यांनी याबाबत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांना याबाबत कळविले. शेख यांनी फौजदार सिद्धेश्‍वर मुरकुटे यांना पथकासह पाठविले. पोलिस आल्याची माहिती मिळताच पळ काढलेल्या शिव खोसे यास पथकाने पाठलाग करत पकडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.