Latest Sambhajinagar News: पडेगाव भागातील रामेश्वर संजय आमले (वय ३०) याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे गुरुवारी रात्री घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रात्री बारा वाजता त्याचा मृत्यू झाला.
रामेश्वरच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीमध्ये ‘धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जीव गेला तरी पर्वा नाही’ असा उल्लेख असल्याचे आढळून आले. त्याने आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.