‘हरित रामपुरी’साठी सरसावली तरुणाई

file photo
file photo
Updated on

परभणी : लॉकडाउनच्या काळात वृक्षलागवड मोहिमेवर परिणाम होऊ नये आणि लावलेल्या झाडांचे संगोपन व्हावे यासाठी रामपुरी (ता. मानवत) येथील वृक्षवल्ली फाउंडेशनने जगलेल्या वृक्षांना दररोज पाणीपुरवठा करणे आणि नवीन वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम हाती घेतले आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळत तरुण या उपक्रमात सहभागी झाले आहेत.‘हरित रामपुरी’ साठी तरुणाई धडपडत आहे.

लॉकडाउनमुळे सर्वत्र कामे ठप्प आहेत. उपाशी माणसांना अन्न, पाणी दिले जात आहे. लहान आणि वाढीच्या अवस्थेत असणाऱ्या निर्सगरूपी वृक्षांना भर उन्हाळ्यात पाण्याची गरज असते. पाणी न मिळाल्यास वृक्ष कोमेजू लागतात. नेमकी हीज गरज ओळखून रामपुरी (ता. मानवत) येथील युवकांनी गत तीन वर्षांपासून लावत आलेल्या वृक्षांना पाणी देण्याचे काम हाती घेतले आहे. गोदावरी नदीच्या काठावर  वसलेल्या रामपुरी गावाला निसर्ग सौंदर्य लाभले आहे.

तळमळीने जोपासना
 गावात उच्च शिक्षित तरुण मोठया प्रमाणावर आहेत.  याच तरुणांनी  एकत्र येऊन  स्वच्छ, सुंदर व हरित रामपुरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगून २०१७ मध्ये वृक्षलागवड चळवळ सुरू केली होती. लावलेले रोपटे बघता बघता आज वटवृक्ष होत आहेत. वृक्षवल्ली फाउंडेशनने लावलेल्या झाडांची  प्रत्येकजण आपुलकीने व अतिशय तळमळीने जोपासना करत आहे. प्रत्येकजण आपल्या परीने श्रमदान, आर्थिक मदत करून आपला सहभाग नोंदवित आहेत.

नव्याने ५०० वृक्षरोपांची लागवड
गावातील प्रमुख रस्त्यावर एक हजार वृक्ष लावली आहेत. तीन वर्षांनंतर लावलेल्या रोपांचे मोठ्या झाडात रूपांतर झाले आहे. सध्या कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने सर्व तरुण गावात एकत्र येऊन झाडे जोपासण्याचे दैनंदिन काम करत आहेत. याच युवकांनी आता ‘चला जोपासू महापुरुषांच्या आठवणी’  या अभिनव संकल्पनेतून पुन्हा वृक्षलागवडीचे काम हाती घेतले आहे.  नव्याने ५०० वृक्षरोपांची लागवड केली जाणार आहे.
 
हेही वाचा व पहा : Video : ४५ हजारांची हातभट्टी दारू नष्ट; महिलेवर गुन्हा : वाचा कुठे?
 

रानमेवा फळ उद्यान करण्याचा मानस
यामध्ये गावातील शिक्षक, वकील, बँकेतील अधिकारी-कर्मचारी, विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, सरकारी, खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी तसेच गावातील वृक्षप्रेमी तरुण व नागरिक स्वयंस्फूर्तीने दररोज सकाळी सात ते ११ या वेळेत नवीन झाडे लावणे, लावलेल्या झाडांना ठिबक करणे, त्यांची मशागत करणे तसेच गावातील स्वच्छता करणे हा उपक्रम राबवत आहेत. येत्या जून महिन्यात  दुर्मिळ होत असलेल्या रानमेवा फळ उद्यान करण्याचा या तरुणांचा मानस आहे.

वृक्षलागवडीची चळवळ 
रामपुरी गावातील युवकांनी एकत्रित येऊन वृक्षलागवडीची चळवळ सुरू केली  असून लॉकडाउनच्या काळातदेखील सोशल डिस्टन्सिंग व सर्व दक्षता घेऊन वृक्ष संगोपनाचे काम गावातील युवक करत आहेत. ही सर्वांसाठी प्रेरणादायी अशी बाब आहे.
- ओमप्रकाश  यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी
 जिल्हा परिषद तथा भूमिपुत्र रामपुरी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.